Thursday, 03 Dec, 9.04 am HELLO महाराष्ट्र

पुणे
शिक्षक-पदवीधर जागांचा आज निकाल; भाजप कि महाविकास आघाडी, कोण बाजी मारणार?

पुणे । राज्यातील विधानपरिषदेच्या 3 पदवीधर, 2 शिक्षक मतदारसंघासाठी (Graduate Constituency Elections) आणि एका स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी 1 डिसेंबरला मतदान झालं. पुणे, औरंगाबाद, नागपूर या पदवीधर आणि पुणे, अमरावती शिक्षक मतदारसंघ आणि धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतरादरसंघासाठी मतदान झालं आहे. आज या निवडणुकांची मतमोजणी होणार आहे.

राज्यात महाविकासआघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर ही पहिली मोठी निवडणूक असल्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपने ताकद पणाला लावली होती. विधानपरिषदेच्या निकालाचा महाराष्ट्रातील आगामी राजकारणावर परिणाम दिसून येतील. नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात, पहिला कौल दुपारी दोन नंतर येणार, निकाल रात्री उशिरा किंवा पहाटेपर्यंत लागणार

पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात
पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात, पदवीधर साठी ११२ आणि शिक्षक मतदार साठी ४२ टेबल, मतमोजणी केंद्रावर पदवीधर मतदारसंघासाठी १८ हॉल, तर शिक्षक मतदारसाठी ६ हॉल, पदवीधरसाठी १२६ पर्यवेक्षक, २५२ सहायक आणि १२६ शिपायांची नेमणूक, 'शिक्षक मतदार'साठी ४२ पर्यवेक्षक, ८४ सहायक आणि ४२ शिपायांची नियुक्ती , ४५० पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

'चंद्रकांत पाटलांचा विनोदी विधान करणाचा लौकिक';…

नागपूर पदवीधर मतदारसंघ: भाजपच्या बालेकिल्ल्याचा ढासळतोय…

अमरावती शिक्षक मतदारसंघ: किरण सरनाईकांची विजयाकडे वाटचाल;…

औरंगाबादमध्ये मतपेट्या उघडण्यास सुरुवात
औरंगाबाद : औरंगाबादेत मतपेट्या उघडायला झाली सुरूवात, 56 टेबलवर उघडल्या जात आहेत मतपेट्या, मतपेट्या उघडून वैध मते आणि बाद मते केली जाणार वेगळी,वैध मतांची थोड्याच वेळात होणार मोजणी

अमरावती शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीचा प्रक्रिया सुरु
अमरावती: विधानपरिषदेच्या अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज रोजी होणार आहे. येथील विलासनगरातील शासकीय गोदामात ही सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. शिक्षक मतदारसंघासाठी अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यात एकूण 30 हजार 869 मतदारांनी मतदान केले.मतमोजणीच्या ठिकाणी 14 टेबलवर ही मतमोजणी होत आहे. (Maharashtra Graduate and Teacher Constituency Elections Result)

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top