Wednesday, 08 Jul, 7.22 pm HELLO महाराष्ट्र

होम
तोडफोड प्रकरणानंतर राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान 'राजगृहा'ला संरक्षण देण्याची आंबेडकरी जनतेची आणि आंबेडकर कुटुंबाची मागणी पूर्ण झाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत चर्चा झाली. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमताने राजगृहाला २४ तास संरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मंगळवारी संध्याकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञात व्यक्तीकडून तोडफोड करण्यात आली. घराच्या काचांवर दगडफेक केली गेली आणि कुंड्यांचेही मोठे नुकसान केले गेले. आंबेडकर कुटुंबियांकडून सीसीटीव्ही फूटेज पोलिसांना देण्यात आले असून पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

राजगृहाचा अवमान करणाऱ्यांना सरकार सोडणार नाही- मुख्यमंत्री

बनावट नोटांचा व्यवसाय वाढत आहे ! २००० आणि ५०० ​​च्या खऱ्या…

बाबा आढाव हे एक चिवट आणि निडर चळवळ्या नेते - शरद पवार

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आणि बाबासाहेब आंबेडकरांचे नातू प्रकाश आंबेडकर यांनी या घटनेनंतर सर्वांना राजगृह परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे. या माथेफेरु हल्लेखोरांना अटक करून कडक कारवाई करावी अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील दोषींवर कडक कारवाईचे आदेश दिले असून राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं आश्वासन दिलं.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top