Sunday, 07 Mar, 12.17 pm HELLO महाराष्ट्र

होम
तुमच्या बाबतीत गुन्हेगारी गोष्ट घडलीय अन् पोलिस FIR नोंदवून घेत नाहीयेत? तर त्यांना 'हे' सांगा

कायद्याचं बोला #9 | स्नेहल जाधव

गुन्हा झाल्यावर तो कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये नोंदवावा यावरून बऱ्याच लोकांना माहित नसतं त्यामुळे बऱ्याचदा लोकांची तारांबळ उडते. गुन्हा घडलेली जागा आमच्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत येत नाही असे सांगून काही पोलीस गुन्ह्याची नोंद घेणं टाळतात. पीडित व्यक्तीला तर ह्या गोष्टीचा मनस्ताप होऊच शकतो शिवाय चौकशी करण्याचा महत्वाचा वेळ निघून गेला तर गुन्हेगार पळून जाण्यास संधी तसेच पुरावे लपवण्यास वेळ मिळू शकतो. यासाठी दखलपात्र गुन्ह्यांसाठी zero FIR ची तरतूद कायद्यामध्ये आहे.

सर्वप्रथम जाणून घ्या FIR म्हणजे काय? -
◆ FIR हा एक महत्वाचा दस्तऐवज असतो ज्यात गुन्ह्याची पहिली अधिकारीक माहिती असते. ही FIR पोलीस दाखल करून घेतात.

◆ FIR चा हेतू गुन्ह्याबद्दल लवकरात लवकर माहिती मिळवणे, लवकर तपास सुरू करून पुराव्यामध्ये छेडछाड होण्याआधी ते गोळा करणे हा आहे.

गनीमीकाव्यानं अहिल्यादेवी होळकरांच्या पुतळ्याचं अनावरण आलं…

मोदींच्या मतदारसंघात गुगलचे CEO सुंदर पिचई यांच्याविरोधात…

या ३ खानांविरोधात मुंबई पोलिसांत FIR दाखल; Covid-19 संबंधित…

Zero FIR म्हणजे काय?
जर एखादा दखलपात्र गुन्हा(Cognizable Crime) हा एखाद्या पोलीस स्टेशनच्या अखत्यारीत घडला नसेल तर त्या तक्रारीला कोणताही गुन्हा दाखल क्रमांक न देता नोंदवून घेतले जाते त्यास झिरो FIR म्हणतात. त्यानंतर ती ताबडतोब अधिकार क्षेत्रातल्या पोलीस स्टेशन कडे वर्ग केली जाते. त्यामुळे तक्रारदारास पोलिस त्याच हद्दीतील पोलिस स्टेशनमध्ये जा, अशी सक्ती करू शकत नाहीत. तसं होत असेल तर तक्रारदार वरिष्ठ पोलीसांकडे तक्रार करू शकतो.

सूचना - वरील विषयाबाबत किंवा कायद्याबाबत तुमचे इतर काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की कळवा पुढच्या भागात त्यावर माहिती देण्याचा प्रयत्न असेल…

- अ‍ॅड. स्नेहल जाधव
(लेखिका व्यवसायाने वकिल असून त्या कायदादूत संस्थेच्या संस्थापक आहेत)
संपर्कासाठी इमेल पत्ता - [email protected]

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा 'hello news'

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top