Sunday, 09 May, 8.25 pm HELLO महाराष्ट्र

होम
विराट कोहलीच्या नावावर झाला 'हा' लाजिरवाणा विक्रम

मुंबई : हॅलो महाराष्ट्र - सध्या देशात कोरोनाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. खेळाडूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याने यंदाची आयपीएल स्थगित करण्यात आली आहे. यंदाच्या आयपीएलमधील ३१ सामने अजून बाकी आहेत. आता हे सामने कधी होणार याबद्दल बीसीसीआयने अजून काहीही सांगितले नाही. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने धडाकेबाज पुनरागमन करत उत्तम कामगिरी केली होती.

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची फायनल टीम निवडताना भारताने…

'पँट का घातली नाहीस..?' ऑस्ट्रेलियन खेळाडूच्या…

इंग्लंडनंतर आता 'या' देशाच्या खेळाडूंची…

या स्पर्धेमध्ये यशस्वी फलंदाज असा विक्रम आहे. विराटने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करत ६ हजार धावांचा टप्पा पार केला आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज ठरला आहे. त्याच्या नावावर अजून काही विक्रमांची नोंद आहे. या विक्रमांबरोबर त्याच्या नावावर एका नकोश्या विक्रमाचीदेखील नोंद झाली आहे. हा विक्रम म्हणजे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आयपीएलमध्ये जेवढे सामने हरले आहेत त्या प्रत्येक सामन्यात विराटने सर्वाधिक धावा केल्या आहेत.

विराटने आयपीएलमध्ये एकूण ६ हजार धावा केल्या आहेत त्यामधील २ हजार ८०२ धावा त्याने पराभव झालेल्या सामन्यात केल्या आहेत. संघाचा पराभव झालेल्या सामन्यात विराटने बाकी फलंदाजपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराटनंतर शिखर धवनचा क्रमाक येतो. शिखर धवनने २ हजार २२५ धावा केल्या आहेत. त्यानंतर तिसऱ्या, चौथ्या,पाचव्या क्रमांकावर अनुक्रमे डेव्हिड वॉर्नर २ हजार २१८ धावा, रॉबिन उथप्पा २ हजार २०५ धावा तर एबी डिव्हिलियर्स १ हजार ९९३ धावा यांचा नंबर लागतो.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: Hello Maharashtra
Top