
मुंबई, 14 मार्च (हिं.स.)।पिडिलाईट इंडस्ट्रीज लिमिटेडचा भारतातील सर्वात आयकॉनिक ऍडहेसिव्ह ब्रँड फेविकॉलने मरोळ नाका मेट्रो स्टेशनचे नाव बदलून 'फेविकॉल मरोळ नाका' करण्याची घोषणा केली आहे.
ब्रँडच्या शहराशी असलेल्या खोलवर रुजलेल्या नात्याला आदरांजलीच नव्हे, तर त्याचे दूरदर्शी संस्थापक, स्वर्गीय बलवंतराय कल्याणजी पारेख, ज्यांना 'फेव्हिकोल मॅन' म्हणून ओळखले जाते, त्यांच्या १०१ व्या जयंतीनिमित्त भावपूर्ण श्रद्धांजली आहे.
मेट्रो स्थानकाचे नाव बदलल्याने केवळ फेविकॉलच्या ब्रँड उपस्थितीला पाठबळ मिळत नाही तर लोक आणि सामान एकत्र आणण्याच्या सोप्या तत्त्वज्ञानावर एक महान संस्था उभी करणाऱ्या व्यक्तीच्या दूरदृष्टीचा सन्मान देखील केला जातो.
या परिवर्तनाचा एक भाग म्हणून मरोळ नाका स्थानकातील एका वास्तूचे वॉक-थ्रू गॅलरीत रूपांतर करण्यात आले असून, त्यात फेविकॉलच्या वर्षानुवर्षे प्रसिद्ध जाहिराती दाखवण्यात आल्या आहेत. ब्रँडच्या समृद्ध वारशाची आठवण करून देणारे हे अनोखे प्रदर्शन प्रवाशांना फेविकॉलच्या संस्मरणीय जाहिरातींची आठवण करून देईल. याव्यतिरिक्त, स्टेशनवरील अनेक डिजिटल स्क्रीनवर फेविकॉलच्या आयकॉनिक जाहिराती चालवण्यात येत आहेत, जेणेकरून प्रवाशांना प्रवासादरम्यान ब्रँडच्या सर्जनशील कथाकथनाचा अनुभव घेता येईल.
यावेळी पिडिलाईट इंडस्ट्रीजचे एमडी भरत पुरी म्हणाले, 'एखाद्याशी कायमस्वरूपी नाते निर्माण करण्यावर आमचा विश्वास आहे. आमचे संस्थापक स्व.श्री. बळवंतराय कल्याणजी पारेख यांनी मुंबईत आपले स्वप्न साकार केले आणि या क्षेत्रात पहिला उत्पादन प्रकल्प सुरू केला. त्यांची १०१ वी जयंती साजरी करत असताना आम्ही त्यांचा वारसा आणि या शहराशी असलेल्या आमच्या नात्यावरती कृतज्ञ आहोत. या परिसरात आता अनेक पिडिलाईट कार्यालये आहेत- हा उपक्रम आमच्या कर्मचाऱ्यांसाठी अभिमानास्पद आहे, जे दररोज या स्टेशनवर येतात.
'मॉम्स'चे मुख्य कार्यकारी अधिकारी जयेश याज्ञिक म्हणाले, 'फेव्हिकॉल हा भारतातील दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने लाखो मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनात केंद्रस्थानी असलेल्या व्यासपीठाची निवड करणे योग्य आहे. मरोळ नाका मेट्रो स्टेशन, एक प्रमुख इंटरचेंज हब म्हणून, फेव्हिकॉलला त्याच्या लक्ष्यित प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे आणि अर्थपूर्णपणे पोहोचण्याची परवानगी देते. मॅडिसनच्या काटेकोर दृष्टिकोनामुळे ही भागीदारी अत्यंत व्यवस्थितरित्या पार पाडली गेली, ज्याचा फेव्हिकोल आणि मुंबई मेट्रो दोन्हीवर कायमस्वरूपी परिणाम दिसून येतो आहे.
टाइम्स ओओएचचे सीओओ रोहित चोप्रा म्हणाले, मरोळ मेट्रो स्टेशनवर एक्सक्लुझिव्ह स्टेशन ब्रँडिंग पार्टनर म्हणून फेविकोलचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. मुंबई मेट्रो लाइन 1 ची एकमेव सवलतदार म्हणून, टाइम्स ओओएच उच्च-दृश्यमानता ट्रान्झिट मीडिया सोल्यूशन्सद्वारे प्रभावी ब्रँड अनुभव देण्यासाठी वचनबद्ध आहे. एखाद्या ब्रँडला दैनंदिन लाखो प्रवाशांसोबत जोडण्यात मेट्रो जाहिरातींची शक्ती पुनर्स्थापित करते आणि अत्यंत आकर्षक वातावरणात कायमस्वरूपी छाप पाडते. मरोळ हे मुंबई मेट्रोच्या लाइन १ (ब्लू लाइन) वरील एक एलिव्हेटेड मेट्रो स्टेशन आहे, जे मुंबईतील अंधेरी (पूर्व) येथील मरोळ परिसराला सेवा देते. अंधेरी, मुंबईतील एक प्रमुख व्यावसायिक आणि निवासी केंद्र असल्याने, वैविध्यपूर्ण प्रेक्षकांना लक्ष्य करताना ब्रँड व्हॅल्यू तयार करण्यासाठी हे एक आदर्श स्थानक ठरते. आम्हाला विश्वास आहे की, हे स्टेशन ब्रँडच्या मार्केटिंग उपक्रमांसाठी एक महत्त्वपूर्ण योगदान देईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर