Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
१४ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! सीसीएमपी उत्तीर्ण Homeopathy डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी सुरु

१४ वर्षांच्या संघर्षाला अखेर यश! सीसीएमपी उत्तीर्ण Homeopathy डॉक्टरांची MMC मध्ये नोंदणी सुरु

‘सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी’ (CCMP) पूर्ण केलेल्या ‘बीएचएमएस’ (BHMS) म्हणजेच होमिओपॅथी डॉक्टरांची महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेमध्ये (MMC) नोंदणी करण्यास सुरूवात केली आहे.

त्यामुळे ॲलोपॅथी प्रॅक्टिस करण्याचा होमिओपॅथी डॉक्टरांचा मार्ग मोकळा झाला आहे. यानिमित्ताने गेल्या १४ वर्षांपासून होमिओपॅथी डॉक्टरांची एमएमसी नोंदणी करण्याची मागणी अखेर पूर्ण झाली आहे.(Homeopathy Doctors Get MMC Registration)

होमिओपॅथी डॉक्टर मंगळवारी संध्याकाळपासून महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यालयाबाहेर ठिय्या देऊन बसले होते. अखेर काल रात्री उशिरा होमिओपॅथी डॉ. नेहा पवार यांना पहिले एमएमसी प्रमाणपत्र मंजूर करण्यात आले. पहिले एमएमसी प्रमाणपत्र मिळताच होमिओपॅथी डॉक्टरांनी महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडत आणि गुलाल उधळत आनंद साजरा केला.(Homeopathy Doctors Get MMC Registration)

या नोंदणीमुळे पात्र होमिओपॅथी डॉक्टरांना (अटींच्या अधीन राहून) ॲलोपॅथी औषधे देण्याची परवानगी मिळणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागात वैद्यकीय सेवा सक्षम करण्याच्या उद्देशाने २०१४ मध्ये हा कोर्स सुरू करण्यात आला होता. याआधी सुमारे २५०० हून अधिक डॉक्टरांनी नोंदणीसाठी अर्ज केले होते.(Homeopathy Doctors Get MMC Registration)

राज्यातील निवासी डॉक्टरांचा आज राज्यव्यापी संप

या निर्णयाला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) आणि इतर निवासी डॉक्टरांच्या संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला असून ॲलोपॅथिक डॉक्टरांनी २४ तास कामबंद आंदोलन पुकारले आहे. ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ (IMA) आणि विविध वैद्यकीय संघटनांच्या मते, केवळ वर्षभराचा कोर्स करून ॲलोपॅथी उपचारांची परवानगी देणे चुकीचं आहे. ५ ते ६ वर्षांचे कठोर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांवर हा अन्याय आहे. या निर्णायामुळे रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हा निर्णय सरकारने मागे घ्यावा, अशी मागणी ॲलोपॅथिक डॉक्टरांनी केली आहे.(Homeopathy Doctors Get MMC Registration)

काय आहे वाद ?

‘एममसी’ ही ॲलोपॅथी डॉक्टरांची (एमबीबीएस, एम एस, एमडी) नोंदणी व नियमन करणारी परिषद आहे. शासनाने अलीकडेच ‘सीसीएमपी’ हा ब्रिज कोर्स केलेल्या होमिओपॅथी डॉक्टरांना देखील अलोपॅथी प्रॅक्टिस करण्याची परवानगी देत त्यांची ‘एममसी’ मध्ये एका स्वतंत्र नोंदवहीत नोंद करण्याची मुभा दिली आहे. त्याला अलोपॅथी डॉक्टरांचा विरोध आहे.(Homeopathy Doctors Get MMC Registration)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post