Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

आता क्यू आर कोड स्कॅन करताच मिळणार मोफत इंटरनेट, PM-WANI योजनेची नवीन रूपरेषा सरकारकडून तयार

PM-WANI भारतात फ्री वायफायचे नवीन अपडेट आले आहे. आता क्यू आर कोड (QR code) स्कॅन केल्यावर लगेच इंटरनेट मिळणार आहे. यासाठी सरकारने PM-WANI योजनेची नवीन रूपरेषा तयार केली आहे. यामुळे लोकांना रेल्वे स्टेशन, बस स्टॉप आणि इतर सार्वजनिक ठिकाणी सोप्या आणि सुरक्षित पद्धतीने WIFI वायफाय वापरता येणार आहे.

यापूर्वी PM-WANI-WIFIजोडण्यासाठी लांबलचक पासवर्ड आणि लॉग इन प्रक्रिया करावी लागायची. आता ही प्रक्रिया पूर्णपणे बदलली आहे. नव्या प्रणालीत तुम्हाला फक्त स्मार्टफोनने स्क्रीनवर दिसणारा क्यू आर कोड स्कॅन करायचा आहे. काही सेकंदात इंटरनेट सुरू होईल. लॅपटॉप, टॅब्लेट किंवा इतर कोणत्याही उपकरणासाठी ही प्रक्रिया खूप सोपी झाली आहे. वेळ वाचेल आणि वापरकर्त्यांचा अनुभव खूप चांगला होईल.

Hardik Pandya : ४ कोटी फॉलोअर्स असलेलं इन्स्टाग्राम अकाऊंट हार्दिकने अचानक का बंद केलं?

15, 30 आणि 60 मिनिटांचे स्वस्त प्लॅन
लोकांच्या छोट्या-छोट्या गरजा लक्षात घेऊन सरकारने नवी कमी मुदतीचे प्लॅन सुरू केली आहे. आता तुम्हाला फक्त 15 मिनिटे, 30 मिनिटे किंवा 60 मिनिटांसाठी WiFi घेता येईल. रेल्वे स्टेशनवर थोडा वेळ थांबलात, बसची वाट बघताय किंवा तातडीने काही माहिती हवी असेल तर हे प्लॅन खूप उपयुक्त ठरतील. कमी पैशात गरजेनुसार डेटा वापरण्याची सोय झाली आहे.

बनावट वायफाय नेट
सार्वजनिक ठिकाणी बनावट वायफाय नेटवर्कमुळे अनेकांची फसवणूक होत होती. यावर आता सरकारने कडक पावले उचलली आहेत. सर्व अधिकृत PM-WANI नेटवर्कसमोर PMWANI ब्रँडिंग अनिवार्य करण्यात आले आहे. यामुळे लोकांना खरे नेटवर्क आणि बनावट नेटवर्क सहज ओळखता येईल. डेटा चोरी आणि सायबर फसवणुकीचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होईल.

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post