इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांच्या निधनानंतर, संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्या शासकीय अंत्यविधीकडे लागले आहे. अनेक महिन्यांनंतर होणाऱ्या या अंत्यविधीला जगभरातील प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
भारतातील अनेक प्रमुख राजकीय, धार्मिक आणि शासकीय व्यक्तीही इराणमध्ये दाखल होत आहेत. बिहारचे राज्यपाल सय्यद अता हसनैन, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री पवित्रा मार्गेरिटा, काँग्रेस नेते सलमान खुर्शीद, पीडीपी प्रमुख मेहबूबा मुफ्ती आणि जैन साधू आचार्य लोकेश यांच्यासह इतर अनेक भारतीय प्रतिनिधी मंडळे खामेनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी इराणला जाणार आहेत.
इराणने भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना आमंत्रित केले आहे. तथापि, ते या अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी इराणला जातील की नाही, हे अद्याप निश्चित झालेले नाही. भारताने गुरुवारी जाहीर केले की, इराणचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांच्या शासकीय अंत्यविधीला देशाचे प्रतिनिधित्व उप परराष्ट्र मंत्री आणि बिहारचे राज्यपाल करतील. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, बिहार, जम्मू आणि काश्मीरचे राज्यपाल सय्यद अता हसनैन आणि उप परराष्ट्र मंत्री पवित्रा मार्गेरिटा ३ जुलै रोजी इराणला भेट देतील.
( नाव हिंदू, कट मुस्लिम! कानपूरमध्ये 'Love Jihad'चं मोठं रॅकेट उघड; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या )
काँग्रेसचे प्रतिनिधित्व कोण करणार?
जम्मू आणि काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) च्या अध्यक्षा मेहबूबा मुफ्ती आणि काँग्रेस नेते सलमान खुर्शीद हे देशाचे दिवंगत सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी (Ali Khamenei) यांच्या शासकीय अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी गुरुवार, २ जुलै रोजी इराणला जाणार आहेत. सलमान खुर्शीद म्हणाले, “मी पक्षाचे प्रतिनिधित्व करत आहे आणि सर्वोच्च नेते अयातुल्ला सय्यद अली खामेनी (Ali Khamenei) यांच्या शासकीय अंत्यविधीला उपस्थित राहणार आहे. कॉन्फरन्स (एनसी) चे खासदार आणि शिया धर्मगुरू आगा सय्यद रुहुल्लाह, जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्सचे नेते आणि शिया धर्मगुरू इम्रान अन्सारी, शिया धर्मगुरू आगा सय्यद मोहम्मद हादी, शिया धर्मगुरू मसरूर अब्बास अन्सारी, आगा सय्यद हसन मोसावी अल सफवी, आणि जैन भिक्षू व आध्यात्मिक नेते आचार्य लोकेश मुनी हे खामेनींच्या (Ali Khamenei) अंत्यविधीला उपस्थित राहण्यासाठी इराणला जाणार आहेत.
युरोपीय देश चुकीच्या बाजूला असल्याचे सांगून इराणने त्यांना खामेनींच्या (Ali Khamenei) अंत्यविधीसाठी आमंत्रित केले नव्हते. अमेरिका-इराण हल्ल्यात खामेनी मारले गेले. इराणवर ३६ वर्षे राज्य करणारे अली खामेनी (Ali Khamenei) २८ फेब्रुवारी रोजी झालेल्या अमेरिका-इस्रायल हल्ल्यात मारले गेले. ते अमेरिकेचे कट्टर टीकाकार मानले जात होते. तेहरानवरील हल्ल्यांमुळे मध्यपूर्वेत भीषण युद्धाला तोंड फुटले. परिणामी, खामेनींचा अंत्यविधी झाला नाही. आता, युद्धविरामानंतर, माजी सर्वोच्च नेत्यावर अंत्यसंस्कार केले जातील. त्यांच्या अंत्यविधीला ४ जुलै रोजी तेहरानमध्ये सुरुवात होईल आणि ९ जुलै रोजी ईशान्येकडील त्यांचे मूळ गाव असलेल्या पवित्र शहर मशहदमध्ये त्यांच्या दफनविधीने समारोप होईल.
