Facebook-Instagram New Rules for Under 18 : सोशल मीडिया वापरामुळे मुलांवर होणाऱ्या परिणामांबाबत वाढत्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर मेटाने फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरणाऱ्या १८ वर्षांखालील युझर्ससाठी मोठे बदल करण्यास सहमती दर्शवली आहे.
अमेरिकेतील राज्यांच्या अटर्नी जनरल्ससोबत झालेल्या सुमारे १८ अब्ज डॉलरच्या कराराचा हा भाग आहे. या कराराला अद्याप न्यायालयाची मंजुरी आवश्यक आहे.(Facebook-Instagram New Rules for Under 18)
दिवसाला फक्त दोन तास सोशल मीडिया
नव्या नियमांनुसार १८ वर्षांखालील युझर्ससाठी फेसबुक आणि इंस्टाग्रामचा एकत्रित वापर दिवसाला दोन तासांपर्यंत मर्यादित केला जाणार आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर घालवलेला वेळ या मर्यादेत मोजला जाईल. याशिवाय, युझरकडे एकापेक्षा अधिक अकाउंट असल्याचे आढळल्यास त्याचा एकत्रित वापरही लक्षात घेतला जाईल. मात्र, पालकांच्या परवानगीने ही मर्यादा बदलता येणार आहे.(Facebook-Instagram New Rules for Under 18)
रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत 'Night Mode'
१८ वर्षांखालील युझर्सना रात्री १२ ते सकाळी ६ वाजेपर्यंत फेसबुक आणि इंस्टाग्राम वापरता येणार नाही. या काळात Feed, Stories, Explore आणि Reels पाहणे किंवा पोस्ट करणेही बंद राहणार आहे. (Facebook-Instagram New Rules for Under 18)
शाळेच्या वेळेत Notifications बंद
मेटाकडून 'School Mode' देखील लागू केला जाणार आहे. शाळेच्या वेळेत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ॲपचे सर्व नोटिफिकेशन्स बंद ठेवण्यात येतील. (Facebook-Instagram New Rules for Under 18)
Likes आणि Reactions दिसणार नाहीत
अल्पवयीन युझर्सना स्वतःच्या किंवा इतरांच्या पोस्टवरील लाईक्स आणि रिएक्शन्सची संख्या दिसणार नाही. याशिवाय काही 'extreme makeup filters' आणि cosmetic surgeryसारख्या फिल्टर्सवरही निर्बंध आणले जाणार आहेत.(Facebook-Instagram New Rules for Under 18)
पालकांचे नियंत्रण वाढणार
पालकांना मुलांच्या सोशल मीडिया वापरावर अधिक नियंत्रण आणि माहिती मिळणार आहे. मुलाने दुसरे खाते जोडल्यास पालकांना त्याची माहिती मिळू शकते. तसेच, संशयास्पद व्यक्तींसोबतच्या संवादाबाबत पालकांना सूचना देण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.(Facebook-Instagram New Rules for Under 18)

