Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Anaya Bangar WBBL : बीसीसीआयने संधी नाकारल्यावर अनया बांगरची ऑस्ट्रेलियाकडे धाव, बिग बॅश खेळणार

Anaya Bangar WBBL : बीसीसीआयने संधी नाकारल्यावर अनया बांगरची ऑस्ट्रेलियाकडे धाव, बिग बॅश खेळणार

  • ऋजुता लुकतुके

Anaya Bangar WBBL : भारताचा माजी क्रिकेटपटू संजय बांगर यांचा मुलगा अनया बांगरने लिंग संक्रमणाच्या शस्त्रक्रियेनंतर महिला क्रिकेट खेळण्याची इच्छा व्यक्त केली होती. बीसीसीआयने ती संधी नाकारल्यावर आता त्याने ऑस्ट्रेलियाचा रस्ता धरला आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने तिला महिलांच्या बिगबॅशमध्ये खेळण्याची परवानगी किंवा पात्रता दिली आहे. त्यामुळे अनया बांगर आता क्रिकेटमधली पहिली भारतीय ट्रान्सजेंडर क्रिकेटपटू ठरली आहे.

अनया बांगरने २०२३मध्ये पुरुष क्रिकेट खेळत असताना क्रिकेटमधून ब्रेक घेतला आणि त्यानंतर लिंग संक्रमणाची प्रक्रिया सुरू केली. तिने स्वतःला महिला म्हणून ओळख देत पुढे महिला क्रिकेटमध्ये खेळण्याची इच्छा व्यक्त केली. तिच्या या प्रवासाबाबत तिने सोशल मीडियावरही माहिती शेअर केली होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या नियमांनुसार, महिला क्रिकेटमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंच्या लिंग पात्रतेचे वैद्यकीय आणि धोरणात्मक निकष तपासले जातात. अनयाच्या बाबतीत आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तिला महिला बिगबॅश लीगमध्ये खेळण्याची परवानगी दिली आहे.

( – शिवसेनेच्या मंत्र्यांची आता थेट परीक्षा? कॅबिनेटआधी Eknath Shinde राबवणार मंत्र्यांचा 'रिपोर्ट कार्ड' फॉर्म्युला )

ही मंजुरी केवळ एका खेळाडूच्या कारकिर्दीसाठी महत्त्वाची नाही, तर महिला क्रिकेटमधील समावेशकतेच्या चर्चेसाठीही महत्त्वाचा टप्पा आहे. मात्र महिला क्रिकेटमध्ये ट्रान्सजेंडर खेळाडूंच्या सहभागाबाबत जगभरातील क्रिकेट संस्था वेगवेगळी धोरणे वापरतात. त्यामुळे अनयाच्या पात्रतेचा मुद्दा भविष्यातही चर्चेचा विषय ठरू शकतो.

अनया बांगर ही क्रिकेटविश्वासाठी परिचित नाव आहे. तिचे वडील संजय बांगर यांनी भारतासाठी १२ कसोटी आणि १५ वनडे सामने खेळले असून नंतर ते भारतीय संघाचे फलंदाजी प्रशिक्षकही राहिले आहेत.

अनयाला आता महिला बिगबॅश लीगमध्ये प्रत्यक्ष खेळण्याची संधी मिळते का, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे. पात्रता मंजूर होणे हा पहिला टप्पा आहे; संघाकडून करार मिळणे आणि अंतिम संघात स्थान मिळणे हे पुढचे टप्पे असतील.

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post