Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Ashish Shelar : आशा भोसले यांच्या नावे मिळणार 'जीवन गौरव'; संगीत क्षेत्रातील दिग्गजांना मिळणार आता १० लाखांचे बक्षीस

  • प्रतिनिधी

Ashish Shelar महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात एका नव्या पर्वाची सुरुवात होणार आहे. संगीत क्षेत्रातील अजरामर व्यक्तिमत्त्व आणि सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, सांस्कृतिक कार्य विभागाने त्यांच्या नावे ‘सूरसम्राज्ञी आशा भोसले संगीत जीवन गौरव पुरस्कार’ सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी गुरुवारी विधानसभेत एका निवेदनाद्वारे या नव्या पुरस्काराची अधिकृत घोषणा केली. (Ashish Shelar)

​आशा भोसले यांनी गेल्या आठ दशकांहून अधिक काळ आपल्या स्वरांनी मराठीसह विविध भारतीय भाषांना समृद्ध केले आहे. भावगीते, लावणी, चित्रपटगीते आणि लोकसंगीतातील त्यांच्या योगदानामुळे महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख जागतिक स्तरावर पोहोचली आहे. या अतुलनीय कारकीर्दीचा गौरव करण्यासाठी आता राज्य शासन विशेष पुढाकार घेत आहे. (Ashish Shelar)

​या पुरस्काराचे स्वरूप अत्यंत आकर्षक असून, यात १० लाख रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि शाल देऊन संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान केला जाणार आहे. हा पुरस्कार कोणाला द्यावा, याची निवड करण्यासाठी संगीत तज्ज्ञांची एक विशेष समिती गठीत केली जाणार असल्याची माहितीही मंत्री शेलार यांनी दिली. (Ashish Shelar)

​विशेष म्हणजे, या पुरस्काराचे वितरण दरवर्षी ८ सप्टेंबर किंवा त्या तारखेच्या आसपास, आशा भोसले यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून केले जाणार आहे. संगीत साधनेमध्ये आयुष्य वेचणाऱ्या कलाकारांसाठी हा पुरस्कार एक सर्वोच्च सन्मान ठरणार असून, सरकारच्या या निर्णयाचे कलाविश्वातून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. (Ashish Shelar)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post