Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
BCCI Review Meeting : आयर्लंड, इंग्लंडच्या अपयशाचा हिशोब होणार, बैठकीसाठी गिल - अय्यरलाही बोलावले

BCCI Review Meeting : आयर्लंड, इंग्लंडच्या अपयशाचा हिशोब होणार, बैठकीसाठी गिल - अय्यरलाही बोलावले

  • ऋजुता लुकतुके

BCCI Review Meeting : भारताच्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने संघाच्या कामगिरीचा सविस्तर आढावा घेण्याची तयारी केली आहे.

गुरुवारी मुंबईतील बीसीसीआयच्या मुख्यालयात होणाऱ्या या बैठकीत कर्णधार शुभमन गिल आणि टी२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर यांनाही बोलावले जाण्याची शक्यता आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर यांच्यासह वरिष्ठ अधिकारी या बैठकीत सहभागी होणार आहेत.

ही बैठक सुरुवातीला आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यानंतर लगेच होणार होती. मात्र, त्यानंतर श्रीलंकेविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका असल्याने बैठक पुढे ढकलण्यात आली. आता भारताच्या अलीकडच्या परदेश दौऱ्यांतील कामगिरीचा व्यापक आढावा घेतला जाणार आहे. विशेष म्हणजे केवळ इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यापुरताच हा आढावा मर्यादित राहणार नाही. झिम्बाब्वे आणि श्रीलंका दौऱ्यांचाही विचार केला जाणार आहे.

( – Sanjay Gandhi National Park अतिक्रमणमुक्त होणार? पात्र अतिक्रमणधारकांना ६,५०० घरं देण्याची Mhada ची तयारी )

आयर्लंडविरुद्धच्या दोन टी-२० सामन्यांमध्ये भारताला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतही भारताची अवस्था खराब झाली. इंग्लंडने मालिकेत भारताला सलग पराभवांचा धक्का दिला. या दौऱ्यात भारतीय फलंदाजांना वेगळी परिस्थिती, वातावरण आणि खेळपट्ट्यांशी जुळवून घेण्यात अडचणी आल्याचे दिसून आले. श्रेयस अय्यरने काही सामन्यांत चांगली फलंदाजी केली असली, तरी संघाला सातत्याने विजय मिळवून देता आला नाही.

या बैठकीत खेळाडूंच्या दुखापतींचाही महत्त्वाचा मुद्दा असेल. जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पांड्या यांच्या फिटनेसबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर २०२७च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी संघाची दिशा काय असावी, यावरही चर्चा होणार आहे.

दरम्यान, माजी कर्णधार रोहित शर्माच्या भवितव्याचाही मुद्दा बैठकीत उपस्थित होऊ शकतो. ३९ वर्षीय रोहितने २०२७चा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, निवड समिती आणि बीसीसीआयच्या भूमिकेबाबत वेगवेगळे अहवाल समोर आले आहेत. त्यामुळे रोहितच्या भवितव्यावरही या बैठकीत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

या बैठकीनंतर भारतीय संघाच्या नेतृत्वापासून निवड प्रक्रिया, खेळाडूंचे फिटनेस व्यवस्थापन आणि २०२७ विश्वचषकाच्या तयारीपर्यंत अनेक बाबींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post