Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
भाजपचे प्रवक्ते Shehzad Poonawala यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत? एक्सवरील बायो बदलल्यानं चर्चा; काय लिहिलंय?

भाजपचे प्रवक्ते Shehzad Poonawala यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत? एक्सवरील बायो बदलल्यानं चर्चा; काय लिहिलंय?

भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वरील आपला बायो बदलल्याने राजकीय वर्तुळात त्यांच्या राजीनाम्याची आणि सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

त्यांनी पक्षाच्या सर्व पदांच राजीनामा दिल्याचा दावा केला जात असला, तरी अद्याप यासंदर्भात भाजपकडून किंवा स्वतः पूनावाला यांच्याकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.(Shehzad Poonawala Bio Change)

‘X’ वरील प्रोफाईलमध्ये बदल

गुरुवारी पूनावाला यांनी आपल्या ‘X’ प्रोफाईलमधून भाजपाच्या कोणत्याही पदाचा उल्लेख हटवला आहे. नव्या बायोमध्ये त्यांनी स्वतःचा उल्लेख ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आजीवन अनुयायी’ असा केला आहे. त्यांनी प्रोफाईलमधील हा बदल नेमक्या कोणत्या कारणाने केला, याबाबत अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.(Shehzad Poonawala Bio Change)

राजकीय संन्यासाचे संकेत

गेल्या काही दिवसांतील त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून ते सक्रिय राजकारणातून बाहेर पडण्याचे संकेत देत असल्याचे दिसून येते. त्यांनी आपल्या जुन्या मुलाखतींच्या काही व्हिडिओ क्लिप्स कोणत्याही कॅप्शनशिवाय शेअर केल्या होत्या, ज्यामध्ये ते राजकारण सोडण्याबद्दल बोलताना दिसत आहेत. दरम्यान, बायो अपडेट आणि सोशल मीडिया पोस्टमुळे तर्कवितर्काना उधाण आले असले, तरी पूनावाला यांच्या अधिकृत भूमिकेकडे आणि भाजपच्या औपचारिक प्रतिक्रियेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(Shehzad Poonawala Bio Change)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post