Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

भारतासाठी धोक्याची घंटा? होर्मुझनंतर Bab el Mandeb सामुद्रधुनीही होणार बंद; तेलाच्या किंमती भडकण्याची शक्यता

Bab el Mandeb: मध्य पूर्वेतील युद्धजन्य परिस्थिती अधिक गंभीर होत चालली असून त्याचे थेट परिणाम जागतिक अर्थव्यवस्थेवर आणि भारतासारख्या तेल आयात करणाऱ्या देशांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

होर्मुझ सामुद्रधुनीत आधीच तेलवाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत झालेली असताना, आता इराण आणि त्याच्या मित्रपक्षांनी अल-मंडेब (Bab el-Mandeb) सामुद्रधुनी बंद करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका-इराण शांतता चर्चेला खीळ बसल्याने आणि इस्रायलकडून लेबनॉनवर हल्ले सुरूच असल्याने परिस्थिती आणखी चिघळली आहे.

इराणच्या तस्नीम या वृत्तसंस्थेनुसार, तेहरानने अमेरिकेसोबत सुरू असलेले अप्रत्यक्ष संवाद थांबवले आहेत. याचबरोबर इराण, येमेन, लेबनॉन आणि इराकमधील त्यांच्या सहयोगी गटांनी होर्मुझ सामुद्रधुनी पूर्णपणे बंद ठेवण्यासोबतच अल-मंडेब सामुद्रधुनीतही दबाव वाढवण्याची रणनीती आखल्याचे वृत्त आहे.

अल-मंडेब सामुद्रधुनी इतकी महत्त्वाची का?

अल-मंडेब सामुद्रधुनी ही येमेन आणि जिबूतीदरम्यान स्थित असून लाल समुद्राला अदनच्या आखाताशी जोडते. हीच समुद्री वाट पुढे जगातील अत्यंत महत्त्वाच्या Suez Canal पर्यंत पोहोचते. आशिया आणि युरोपमधील मोठ्या प्रमाणावरील व्यापार या मार्गावर अवलंबून असतो.

: International Sex Workers' Day : हक्क, सन्मान आणि सुरक्षिततेसाठीचा संघर्ष

ऊर्जा तज्ज्ञांच्या मते, जगातील सुमारे 10 टक्के तेल व्यापार आणि मोठ्या प्रमाणावरील कंटेनर वाहतूक या मार्गातून होते. त्यामुळे जर होर्मुझ आणि अल-मंडेब या दोन्ही सामुद्रधुनींमध्ये अडथळे निर्माण झाले, तर जागतिक पुरवठा साखळीला मोठा धक्का बसू शकतो.

होर्मुझमधील संकट अद्याप कायम

होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सर्वात महत्त्वाच्या तेलवाहतूक मार्गांपैकी एक मानली जाते. जागतिक तेल पुरवठ्याचा जवळपास पाचवा हिस्सा आणि मोठ्या प्रमाणातील LNG वाहतूक या मार्गातून होते. मात्र फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या संघर्षामुळे या मार्गावरील वाहतूक गंभीररीत्या प्रभावित झाली आहे. अनेक तेल कंपन्या आणि जहाज मालकांनी या मार्गावरील वाहतूक स्थगित केली असून विमा खर्च आणि मालवाहतूक दरही प्रचंड वाढले आहेत.

अलीकडील अहवालांनुसार काही टँकर हालचाल करत असले तरी सामान्य परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. अनेक जहाजे अजूनही या परिसरात अडकून पडली आहेत.

भारतावर काय परिणाम होऊ शकतो?

भारत आपल्या गरजेपैकी 80 टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. त्यातील मोठा हिस्सा मध्य पूर्वेतून येतो. त्यामुळे होर्मुझनंतर अल-मंडेब मार्गही असुरक्षित झाल्यास भारतासाठी तेल आयात अधिक महाग होऊ शकते.

तेलाच्या किमती वाढल्यास पेट्रोल, डिझेल, एलपीजी आणि विमान इंधनाच्या दरांवर दबाव वाढू शकतो. याचा परिणाम वाहतूक खर्च, महागाई आणि उद्योग क्षेत्रावरही होण्याची शक्यता आहे. विशेषतः भारतात सणासुदीच्या आणि आर्थिक वाढीच्या काळात इंधन दर वाढल्यास त्याचे पडसाद संपूर्ण अर्थव्यवस्थेत उमटू शकतात.

: IPL 2026 : आरसीबीच्या विजयाला गालबोट, मोठ्या खेळाडूवर निलंबनाची कारवाई

जर होर्मुझ आणि अल-मंडेब या दोन्ही समुद्री मार्गांवर निर्बंध आले, तर तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होऊ शकतो. जहाजांना आफ्रिकेच्या दक्षिण टोकावरील केप ऑफ गुड होप मार्गे वळसा घालावा लागेल. त्यामुळे प्रवासाचा कालावधी अनेक दिवसांनी वाढेल आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ होईल.

ऊर्जा बाजारातील विश्लेषकांच्या मते, अशा परिस्थितीत कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा मोठी उसळी दिसू शकते आणि जागतिक महागाईचा दबाव वाढू शकतो.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post