Dailyhunt

BJP on Sanjay Raut : उबाठाचा आत्मा काँग्रेसच्या वळचणीला; बोटं छाटणाऱ्यांना जनतेनेच दाखवला आरसा!

  • प्रतिनिधी

​मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच, भारतीय जनता पार्टीने ‘उबाठा’ गटावर अत्यंत बोचरी टीका केली आहे. “महाराष्ट्राकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांचा जनतेनेच शाहिस्तेखान केला असून, अशा प्रवृत्तींची बोटं छाटण्याचे काम विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जनतेने आधीच केले आहे,” असा घणाघाती प्रहार भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोमवारी केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी संजय राऊत यांच्या विधानांचा खरपूस समाचार घेतला.(BJP on Sanjay Raut)

​नवनाथ बन यांनी उबाठा गटाच्या बदललेल्या भूमिकेवर निशाणा साधताना म्हटले की, एकेकाळी राज्यातील मोठा पक्ष असलेल्या या संघटनेने आता आपला मूळ आत्मा सोडून दिला असून, ते पूर्णपणे काँग्रेसच्या वळचणीला गेले आहेत. संवेदनशीलतेच्या गप्पा मारणाऱ्या राऊत यांना आरसा दाखवताना त्यांनी नारायण राणे, कंगना राणावत यांची घरे पाडणे आणि नौदल अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनांची आठवण करून दिली. “पत्रकारांचा आवाज दडपणाऱ्या आणि केतकी चितळेसारख्यांना अटक करणाऱ्यांना संवेदनशीलतेवर बोलण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही,” अशी टीका त्यांनी केली.(BJP on Sanjay Raut)

( – West Bengal Election 2026 : भवानीपूरमध्ये पोलिसांकडून मतदारांना धमक्या; भाजपाची निवडणूक आयोगाकडे तक्रार )

​संजय राऊत यांच्या काँग्रेस प्रेमावर भाष्य करताना बन म्हणाले की, राऊत यांना भविष्यात काँग्रेसमध्येच प्रवेश करायचा असावा, म्हणूनच ते सध्या नाना पटोले किंवा बाळासाहेब थोरात यांच्यापेक्षाही जास्त काँग्रेसचा उदोउदो करत आहेत. राहुल गांधींना प्रभावित करण्यासाठीच त्यांची ही धडपड सुरू असल्याचा टोला त्यांनी लगावला. तसेच, नात्यांच्या मुद्द्यावरून राऊत यांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना, “ज्यांनी स्वतःच्या भावाचे नाते जपले नाही आणि अमित ठाकरेंच्या पहिल्याच निवडणुकीत विरोधात उमेदवार उभा केला, त्यांनी भाजपाला नाती शिकवू नयेत,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.(BJP on Sanjay Raut)

​महाविकास आघाडी म्हणजे तीन चाकी रिक्षा असून तिन्ही चाके वेगवेगळ्या दिशांना धावत असल्याची टीका करत, बारामती आणि राहुरी पोटनिवडणुकीवरून या आघाडीत कमालीचे मतभेद असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यातही अंतर्गत गटबाजी उफाळून आली असून, ही आघाडी आता स्वतःच्याच वादात गटांगळ्या खात असल्याचे चित्र नवनाथ बन यांनी मांडले.(BJP on Sanjay Raut)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post