Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

BKTC: केदारनाथ, बद्रीनाथमधूनही देणग्या चोरीला गेल्याचा आरोप, कर्मचाऱ्यांना नोटीस

अयोध्या येथील राम मंदिरापाठोपाठ आता केदारनाथ आणि बद्रीनाथ मंदिरातूनही देणग्या चोरीला गेल्याचा आरोप होत आहे. धार्मिक संघटना भैरव सेनेचे अध्यक्ष संदीप खत्री यांनी बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीला (BKTC) पत्र लिहून BKTC अध्यक्षांच्या (Shri Badarinath Kedarnath Temple Committee) खासगी सहाय्यकावर चोरीचे गंभीर आरोप केले आहेत.

शिकायत मिळाल्यानंतर BKTC चे सीईओ सोहन सिंह रांगड यांनी खासगी सहाय्यकासह सर्व कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावून तीन दिवसांच्या आत उत्तर मागितले आहे. मंदिराचे सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी सुरक्षित ठेवण्यात आले आहे.

–Mumbadevi Temple मंदिराच्या पुनर्विकास प्रकल्पाला सुरुवात, पहिल्या टप्प्याच्या कामासाठी ५७ कोटी रुपये खर्च; प्रशासनाने मागवल्या निविदा

BKTC अध्यक्ष हेमंत द्विवेदी यांनी सांगितले की, मंदिर समिती या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहे. ज्या कर्मचाऱ्यांवर आरोप आहेत, त्यांना स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस बजावण्यात आली आहे. जर कोणताही कर्मचारी दोषी आढळला, तर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

या प्रकरणावर मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून अद्याप कोणतेही विधान आलेले नाही. सरकार या प्रकरणात मंदिर समितीच्या अहवालाची वाट पाहत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post