Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Central Railway: एसी लोकलचा नवा रेकॉर्ड! जानेवारी ते मे दरम्यान १.५० कोटी मुंबईकरांनी घेतली थंडगार प्रवासाची अनुभूती

पनगरी रेल्वे (Central Railway) प्रवासात आता एसी लोकलला प्रवाशांची पसंती मिळू लागल्याचे चित्र समोर आले आहे. उकाडा, गर्दी आणि आरामदायी प्रवासाची वाढती गरज लक्षात घेता मध्य रेल्वेच्या एसी लोकल सेवेला यंदा विक्रमी प्रतिसाद मिळाला आहे.

जानेवारी ते मे २०२६ या कालावधीत तब्बल १.५० कोटी प्रवाशांनी एसी लोकलमधून प्रवास केला असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी संख्येत सुमारे ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. (Central Railway)

मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, २६ जानेवारी ते २० मे २०२६ या कालावधीत एसी लोकलच्या एकूण ८ हजार ९९१ फेऱ्या चालविण्यात आल्या. याच कालावधीत २०२५ मध्ये ६ हजार ८३४ फेऱ्या चालविण्यात आल्या होत्या. म्हणजेच यंदा फेऱ्यांच्या संख्येतही मोठी वाढ करण्यात आली आहे. वाढत्या मागणीमुळे अतिरिक्त सेवा देण्यावर रेल्वे प्रशासनाचा भर असल्याचे दिसून येत आहे. (Central Railway)

- 'Annapurna Yojna' लागू, अर्ज प्रक्रिया सुरू; महिलांना मिळणार मोठा लाभ

दररोज सरासरी १ लाख ३० हजार प्रवासी एसी लोकलचा वापर करत आहेत. कार्यालयीन वेळांमध्ये विशेषतः कल्याण, ठाणे, दादर आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या मार्गांवर एसी लोकलला मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. नियमित लोकलच्या तुलनेत आरामदायी आसनव्यवस्था, वातानुकूलित डबे, तुलनेने कमी गर्दी आणि वेळेचे नियोजन या कारणांमुळे नोकरदार वर्गाचा कल एसी लोकलकडे वाढत आहे. (Central Railway)

- Bakrid च्या आधीच महाराष्ट्रात चाकू हल्ला; राजस्थानात धमक्या तर उत्तर प्रदेशात सरकारचे कडक निर्बंध

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते, सुरुवातीला एसी लोकलच्या तिकिटदरांबाबत प्रवाशांमध्ये संकोच होता. मात्र मासिक पास सवलत, वाढत्या सेवा आणि प्रवासातील आराम यामुळे आता मध्यमवर्गीय प्रवाशांनीही एसी लोकलला पसंती द्यायला सुरुवात केली आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर एसी लोकलचा वापर आणखी वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. प्रवासी संघटनांनीही एसी लोकलच्या वाढत्या लोकप्रियतेचे स्वागत केले असून, अधिक फेऱ्या वाढविण्याची मागणी केली आहे. गर्दीच्या वेळेत अतिरिक्त सेवा सुरू केल्यास नियमित लोकलवरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे मत प्रवासी संघटनांकडून व्यक्त करण्यात येत आहे. (Central Railway)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post