Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Chhatrapati Sambhajinagar च्या राजकारणात खळबळ! तब्बल २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; पुढे काय होणार?

Chhatrapati Sambhajinagar च्या राजकारणात खळबळ! तब्बल २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा; पुढे काय होणार?

प्रतिनिधी

त्रपती संभाजीनगर(Chhatrapati Sambhajinagar)महानगरपालिकेच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महापालिका प्रशासनाने एकाचवेळी २३ नगरसेवकांना अपात्रतेच्या नोटिसा बजावल्याने सत्ताधारी भाजप आणि विरोधी पक्ष एमआयएम या दोन्ही पक्षांमध्ये खळबळ उडाली आहे.

या कारवाईमुळे आगामी सुनावण्यांकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.(Chhatrapati Sambhajinagar)

महापालिका प्रशासनाने भाजपच्या ७ आणि एमआयएमच्या १६ नगरसेवकांना नोटिसा बजावल्या आहेत. यामध्ये दोन्ही पक्षांतील अनेक प्रमुख आणि प्रभावी नगरसेवकांचा समावेश असल्याने या कारवाईला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.(Chhatrapati Sambhajinagar)

( – Maharashtra : सरकारचा यू-टर्न! २४ तासांत बदलला निर्णय; मंत्र्यांना पुन्हा मिळणार छापील वृत्तपत्रे )

ही कारवाई निवडणुकीत पराभूत झालेल्या उमेदवारांनी केलेल्या तक्रारीनंतर सुरू झाली. बेकायदा बांधकाम, अतिक्रमण आणि इतर कथित नियमभंगासंदर्भात पुराव्यांसह तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नगर सचिव, जन्म-मृत्यू विभाग आणि अतिक्रमण विभागाने प्राथमिक चौकशी केली. चौकशी अहवाल प्राप्त झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने संबंधित २३ नगरसेवकांना एकूण ३७ नोटिसा पाठवून स्पष्टीकरण मागवले आहे.(Chhatrapati Sambhajinagar)

प्रशासनाने सर्व संबंधित नगरसेवकांना आपली बाजू मांडण्याची आणि आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली आहे. या प्रकरणांवरील सुनावण्या १७ आणि २४ ऑगस्ट, तसेच ७ आणि १५ सप्टेंबर रोजी होणार आहेत. प्रत्येक सुनावणीत दहा प्रकरणांचा विचार करण्यात येणार असून, संबंधित नगरसेवकांनी पुराव्यासह समाधानकारक स्पष्टीकरण सादर न केल्यास प्रशासन एकतर्फी निर्णय घेऊ शकते, असा इशाराही नोटिसांमध्ये देण्यात आला आहे.(Chhatrapati Sambhajinagar)

या घडामोडीमुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुनावणीनंतर अपात्रतेचा निर्णय झाल्यास महापालिकेतील राजकीय समीकरणांवर त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष आगामी सुनावण्या आणि महापालिका प्रशासनाच्या अंतिम निर्णयाकडे लागले आहे.(Chhatrapati Sambhajinagar)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post