Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CJP सरकारच्या रडारवर, फॉरेन फंडिंगची सखोल चौकशी होणार; मंत्र्यांचा थेट इशारा!

CJP सरकारच्या रडारवर, फॉरेन फंडिंगची सखोल चौकशी होणार; मंत्र्यांचा थेट इशारा!

नीट पेपरफुटीप्रकरणी तत्त्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी CJP ने दिल्लीतील जंतरमंतर येथे आंदोलन केले होते. या आंदोलनात देशविरोधी शक्ती आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक सहभागी झाल्याचे समोर आले होते.

यानंतर आता सीजेपी सरकारच्या रडारवर आली आहे. गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी CJP ला कथित परदेशी फंडिंग होत असल्याच्या आरोपांवर भाष्य केले आहे. या आरोपांची योग्य चौकशी झाली पाहिजे आणि सत्य समोर आले पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.(CJP Foreign Funding)

CJP च्या फॉरेन फंडिंगची चौकशी

सीजेपीला परदेशातून निधी मिळत असल्याचा आरोप केला जात आहे. सीजेपी असो किंवा देशातील इतर कुठल्याही संघटना, ज्यांना फॉरेन फंडींग होत असेल तर त्यांची चौकशी अतिशय आवश्यक असल्याचे गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्रात गृह विभागाने आणि केंद्रात ईडीकडून ही चौकशी सुरू असल्याची माहिती भोयर यांनी दिली आहे.(CJP Foreign Funding)

सीजेपीसह इतर फॉरेन फंडिंग घेणाऱ्या संस्थांची चौकशी सुरू असल्याचे भोयर यांनी स्पष्ट केले. या संस्था फॉरेन फंडिंगचा वापर सकारात्मक कामासाठी वापरत असतील तर हा निर्णय स्वागतार्ह आहे. पण देश, राज्य अथवा समाज अस्थिर करण्यासाठी हा पैसा वापरण्यात येत असेल, संस्था, संघटना जर त्यासाठी त्याचा वापर करत असतील. तर निश्चितपणे त्याची चौकशी करण्यात येईल, असे भोयर यांनी सांगितले. यामुळे सीजेपी ही आता केंद्रीय आणि राज्य तपास यंत्रणांच्या रडारवर आल्याचे मानले जात आहे.(CJP Foreign Funding)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post