Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

CM Medical Assistance Fund चा मदतीचा हात; १०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना मिळाली २४ तासांत आर्थिक मदत

  • प्रतिनिधी

​CM Medical Assistance Fund अपघात किंवा गंभीर आजार उद्भवला की सामान्य कुटुंबावर आभाळ कोसळते, अशाच एका कठीण प्रसंगात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी एखाद्या देवदूतासारखा धावून आल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.

१०० वर्षीय सरूबाई मुंजवार यांना अवघ्या २४ तासांत आर्थिक मदत मिळवून देत, त्यांच्यावरील उपचारांचा मार्ग सरकारने मोकळा केला आहे. (CM Medical Assistance Fund)

​सरूबाई मुंजवार या रस्ता ओलांडताना झालेल्या एका भीषण अपघातात गंभीर जखमी झाल्या होत्या. डाव्या मांडीला झालेल्या दुखापतीमुळे त्यांना तातडीने शस्त्रक्रियेची गरज होती. मात्र, सव्वा लाख रुपयांचा खर्च त्यांच्या कुटुंबाच्या आवाक्याबाहेर होता. अशा वेळी हतबल झालेल्या नातेवाईकांना ‘मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी’ योजनेची माहिती मिळाली आणि त्यांनी त्वरित अर्ज सादर केला. (CM Medical Assistance Fund)

​या अर्जाची दखल मुख्यमंत्री कार्यालयाने अत्यंत संवेदनशीलतेने घेतली. केवळ २४ तासांच्या आत कागदपत्रांची पडताळणी करून निधी मंजूर करण्यात आला, ज्यामुळे सरूबाई यांच्यावर वेळेत शस्त्रक्रिया करणे शक्य झाले. ही तत्परता केवळ एका कुटुंबासाठी आधार ठरली नाही, तर सरकारी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचे उत्तम उदाहरण ठरली आहे. (CM Medical Assistance Fund)

​या योजनेबाबत अधिक माहिती देताना सहाय्यता निधी कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, गरजू रुग्णांना कोणताही विलंब न होता मदत मिळवून देणे हे सरकारचे प्राधान्य आहे. कागदपत्रे पूर्ण असल्यास ही प्रक्रिया अत्यंत जलद गतीने पूर्ण केली जाते. गरजू रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांनी अधिक माहितीसाठी १८०० १२३ २२११ या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. या मदतीमुळे सरूबाई मुंजवार यांच्या कुटुंबीयांनी शासनाचे आभार मानले असून, या घटनेने अनेक गरजू रुग्णांमध्ये एक नवी आशा निर्माण केली आहे. (CM Medical Assistance Fund)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post