Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
CNG Price Hike : मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! 1 तारखेपासून CNG चे नवे दर काय, घ्या जाणून

CNG Price Hike : मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा कात्री! 1 तारखेपासून CNG चे नवे दर काय, घ्या जाणून

CNG Price Hike Mumbai : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत सप्टेंबर महिन्याची सुरुवात, वाहनचालक आणि घरगुती गॅस ग्राहकांसाठी महागाईची ठरली आहे. महानगर गॅस लिमिटेडने (MGL) 1 सप्टेंबरपासून, CNG आणि PNGच्या दरात वाढ केली आहे.

नैसर्गिक वायूच्या वाढलेल्या किमती आणि पश्चिम आशियातील सुरू असलेला तणाव, यामुळे ही दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले आहे.

नवीन दर लागू झाल्यानंतर मुंबई महानगर क्षेत्रात CNGच्या दरात प्रति किलो 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे CNG आता 88 रुपये प्रति किलो दराने मिळणार आहे. तर PNGच्या दरात प्रति SCM 1 रुपयांची वाढ करण्यात आली असून, त्याचा नवा दर 53 रुपये प्रति SCM झाला आहे. (CNG Price Hike Mumbai)

या दरवाढीचा थेट परिणाम CNGवर धावणाऱ्या वाहनचालकांवर मासिक खर्चावर होण्याची शक्यता आहे.

: Mumbai Local Western Railway : 1 सप्टेंबरपासून पश्चिम रेल्वेचे नवे वेळापत्रक लागू; कोणत्या गाड्या नवीन, कोणत्या गाड्या रद्द? पाहा सविस्तर

पश्चिम आशियातील संकटाचा परिणाम

MGLच्या म्हणण्यानुसार, आंतरराष्ट्रीय ऊर्जा बाजारावर सध्या दबाव आहे. पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटामुळे आंतरराष्ट्रीय गॅस निर्देशांकांशी संबंधित इनपुट गॅसच्या किमती वाढल्या आहेत. त्याचा परिणाम देशांतर्गत गॅसच्या खरेदी खर्चावरही झाला आहे. (CNG Price Hike Mumbai)

CNGची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी MGLला Spot Regasified Liquefied Natural Gas (RLNG) वर अधिक अवलंबून राहावे लागले. RLNGच्या किमती वाढल्याने कंपनीचा गॅस खरेदीचा खर्चही वाढला आहे.

कंपनीच्या मते, सध्याची दरवाढ केल्यामुळे वाढलेल्या इनपुट खर्चाचा काही भाग भरून काढण्यास मदत होईल. तसेच ग्राहकांना नैसर्गिक वायूचा सातत्याने पुरवठा सुरू ठेवण्यासाठीही हा निर्णय आवश्यक होता. (CNG Price Hike Mumbai)

12.93 लाख वाहनांवर परिणाम

मुंबई महानगर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाहने CNGचा वापर करतात. MGLच्या माहितीनुसार, या दरवाढीचा परिणाम सुमारे 12.93 लाख वाहनांवर होणार आहे.

यामध्ये ऑटो रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहने तसेच परिवहन प्राधिकरणांशी संबंधित वाहनांचा समावेश आहे. CNGच्या दरवाढीमुळे या वाहनांच्या इंधन खर्चात वाढ होणार आहे. (CNG Price Hike Mumbai)

: Today Horoscope 1 September 2026 : सप्टेंबरची सुरुवातच धमाकेदार! 'या' 4 राशींचं आज नशीब चमकणार

मे महिन्यातही झाली होती दरवाढ

यापूर्वी मे महिन्यातही CNG आणि PNGच्या दरात वाढ करण्यात आली होती. त्यावेळी देशांतर्गत गॅसचा कमी पुरवठा आणि अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली घसरण यामुळे गॅस खरेदीचा खर्च वाढल्याचे MGLने सांगितले होते. मे महिन्यात CNGचा दर 86 रुपये प्रति किलो, तर PNGचा दर 52 रुपये प्रति SCM करण्यात आला होता.

आता पुन्हा एकदा CNG आणि PNGच्या दरात वाढ झाल्याने मुंबईतील परिवहन क्षेत्रासह घरगुती ग्राहकांच्या खर्चावर अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे. सप्टेंबरच्या सुरुवातीलाच झालेल्या या दरवाढीमुळे मुंबईकरांच्या मासिक बजेटवरही परिणाम होऊ शकतो. (CNG Price Hike Mumbai)

हेही पाहा:

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post