पश्चिम बंगालच्या (West Bengal) चर्चित कोळसा तस्करी प्रकरणात अंमलबजावणी संचनालयाने (ED, ईडी) आज, गुरुवारी इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीशी (आय-पॅक) संबंधित अनेक ठिकाणांवर छापेमारी केली.
देशातील हैदराबाद, दिल्ली, बंगळुरूसह इतर शहरांमध्ये एकाचवेळी कारवाई करण्यात आल्याची माहिती ईडीतील सूत्रांनी दिली. (Coal Smuggling Case)
तपासानुसार, आय-पॅकचे सह-संस्थापक ऋषि राज सिंह यांच्या घरावरही ईडीने छापेमारी केली. ईडीला कोळसा तस्करीतून मिळालेल्या पैशांशी संबंधित काही ठोस पुरावे मिळाले आहेत आहेत. त्यामुळे ही अवैध कमाई राजकीय धोरणे किंवा क्रियाकलापांसाठी वापरण्यात आली का याचा ईडी शोध घेतेय.
ऋषि राज सिंह हे 'आय-पॅक'चे सह-संस्थापक आणि संचालक असून, संस्थेतील सुरुवातीचे महत्त्वाचे सदस्य आहेत आणि धोरणात्मक निर्णयात महत्त्वाची भूमिका बजावतात. दरम्यान, गुरुवारी दिल्लीपासून बंगळुरूपर्यंत सुरू असलेल्या ईडीच्या छापेमारीमुळे तणाव निर्माण झाला असून, येत्या काळात या प्रकरणात काही मोठे खुलासे होणार असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली.
ईडीने यापूर्वी देखील आय-पॅकवर कारवाई केली होती. यापूर्वी कोळसा घोटाळा प्रकरणीच ईडीने कोलकाता (Kolkata) येथील आय-पॅकचे कार्यालय आणि प्रमुख प्रतीक जैन यांच्या घरावर छापेमारी झाली होती. तपासात असे आढळले की कोळसा तस्करीतून मिळालेली काळी कमाई शाकंभरी ग्रुप ऑफ कंपनीजकडे पाठवली गेली, आणि हवाला ऑपरेटराद्वारे हे कोट्यवधी रुपये आय-पॅककडे ट्रान्सफर झाले होते.
या कारवाईमुळे बंगालच्या राजकारणात मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्या वेळी मुख्यमंत्री ममता बनर्जी आय-पॅकचे प्रमुख प्रतीक जैन यांच्या घरी पोहोचल्या आणि लॅपटॉप तसेच पेनड्राईव्ह आणि फाईल्स आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. तसेच सदर छापेमारी भाजपच्या निर्देशाखाली केली जात असल्याचा कांगावा केला होता. (Coal Smuggling Case)
हेही पहा –
