Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Crime : डोंबिवलीत काळे कपडे, चेहऱ्यावर मास्क लावून घरफोडीचा प्रयत्न

Crime : डोंबिवलीत काळे कपडे, चेहऱ्यावर मास्क लावून घरफोडीचा प्रयत्न

  • कल्याण : प्रतिनिधी

Crime : कल्याण-शिळ महामार्गावर (Kalyan-Shil Highway) असलेल्या डोंबिवली (Dombivli) जवळच्या सोनारपाड्यात सद्या भितीचे वातावरण पसरले आहे. शंकरानगर येथील समर्थ कृपा इमारतीमध्ये घरफोडीच्या उद्देशाने घुसलेल्या चोरट्यांचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

काळे कपडे आणि तोंडाला मास्क घातलेल्या चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा फिरवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचे व्हिडीओत दिसत आहे. या प्रकारामुळे परिसरातील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. (Crime)

हा सारा प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडला असल्याचे सीसीटीव्ही फुटेजद्वारे समोर आले आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडीओत दोन-चार इसम समर्थ कृपा इमारतीच्या पॅसेजमध्ये फिरताना दिसत आहेत. त्यांनी काळे कपडे घातले असून चेहऱ्याला मास्क लावलेला आहे. घरफोडी करण्याच्या उद्देशाने ते इमारतीत घुसले होते. सीसीटीव्हीमध्ये दिसताच एका चोरट्याने कॅमेऱ्याची दिशा बदलण्याचा प्रयत्न केला. तेथील एका फ्लॅटला चोरट्यांनी लक्ष करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार सकाळी सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर उघडकीस आला. रहिवाशांनी हे फुटेज मानपाडा पोलिसांच्या (Manpada Police) ताब्यात दिले आहे. मात्र या घटनेनंतर स्थानिक रहिवाशांमध्ये दहशत पसरली आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र प्रत्येक चोरट्याने चेहऱ्यावर मास्क परिधान केल्यामुळे तपासात अडथळे येत असल्याने पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाद्वारे तपास चक्रांना वेग दिला आहे. (Crime)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post