Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Crime : नागालँड शस्त्र परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी बनावट पोलिस NOC; मुंबईतील तरुण अटकेत

  • प्रतिनिधी

Crime नागालँड येथून घेतलेल्या बंदुकीच्या परवान्याचे (Arms Licence) नूतनीकरण करण्यासाठी पोलिसांचे खोटे ना हरकत प्रमाणपत्र (PCC) सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या प्रकरणी खार पोलिसांनी फैज इरफान अदेवाला (वय ३६) या मुंबईतील रहिवाशाला अटक केली आहे. या प्रकारामुळे शस्त्र परवाना प्रक्रियेतील त्रुटींवरून गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. (Crime)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी फैज अदेवाला याच्याकडे नागालँड सरकारकडून जारी करण्यात आलेला बंदुकीचा परवाना होता. या परवान्याचे नूतनीकरण करण्यासाठी त्याने पोलिसांचे बनावट ना हरकत प्रमाणपत्र (PCC) तयार करून सादर केले होते. या खोट्या कागदपत्राच्या आधारे त्याने परवान्याचे नूतनीकरणही करून घेतले होते. याव्यतिरिक्त, नियमानुसार बंदुकीची माहिती मुंबई पोलीस आयुक्तालयाला देणे बंधनकारक असताना, अदेवालाने ती लपवून ठेवली होती. (Crime)

हा प्रकार निदर्शनास येताच ६ मे २०२६ रोजी खार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणूक, कागदपत्रे बनावट करणे आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या (Arms Act) विविध कलमान्वये त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तपासानंतर पोलिसांनी २९ मे रोजी त्याला अटक केली. त्यानंतर ३० मे रोजी त्याला वांद्रे न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Crime)

आरोपीने हे बनावट प्रमाणपत्र नेमके कुठून मिळवले आणि अशा प्रकारे आणखी किती जणांनी परवाने मिळवले आहेत, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणात एखाद्या टोळीचा सहभाग असण्याची शक्यता असून, शस्त्रास्त्र परवाना प्रक्रियेत अशा प्रकारच्या फसवणुकीचे आणखी काही प्रकार उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Crime)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post