Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Crime News: हिंदू मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवणाऱ्या रेहानला अटक, पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान त्याने सांगितले.

Crime News: गयाजीमध्ये अनेक हिंदू मुलींना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्यांचे अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोप असलेल्या रेहानने हा कबुलीजबाब दिला आहे. मी मोमोज विकायचो. अनेक मुली ते खायला माझ्याकडे यायच्या.

त्यांच्यापैकी बऱ्याच जणी मला फोनपे (PhonePe) द्वारे ऑनलाइन पैसे द्यायच्या. यामुळे मला त्यांचे नंबर मिळवणे सोपे जायचे. मग मी त्यांना लक्ष्य करून माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचो. यानंतर, मी त्यांना डोंगरावर घेऊन जायचो. माझ्या दबावामुळे त्या मुली घाबरून जायच्या. मग मी त्यांच्यावर बलात्कार करायचो आणि सेल्फी स्टँडवरून स्वतःच व्हिडिओ शूट करायचो.

– Mumbai Rain Alert : "नागरिकांनो सावध राहा, 6 तारखेपर्यंतचे अलर्ट गांभीर्याने घ्या"; मुख्यमंत्री फडणवीसांचे आवाहन, आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांकही जारी

रेहानला पोलिसांनी गुरुवार, २ जुलै रोजी पाटणा येथे अटक केली. पोलीस चौकशीदरम्यान, त्याने तीन मुलींना डोंगरावर नेऊन त्यांच्यावर बलात्कार केल्याचे कबूल केले. आठवी पास रेहानने बांके बाजारमधील पवित्र बांकेधामच्या टेकड्यांना आपल्या वासनेचे लक्ष्य बनवले होते. पोलिसांनी आतापर्यंत त्याच्याकडून १२ हून अधिक अश्लील व्हिडिओ आणि छायाचित्रे जप्त केली आहेत. रेहान फारसा शिकलेला नाही, पण मुलींना जाळ्यात अडकवण्याची त्याची पद्धत खूप हुशारीची होती. पोलीस चौकशीदरम्यान त्याने सांगितले की, तो मोमोचे दुकान चालवत असे. ज्या मुली त्याला ऑनलाइन किंवा ‘फोन पे’ द्वारे पैसे देत, त्यांचे मोबाईल नंबर तो स्वतःकडे ठेवत असे. एकदा नंबर मिळाल्यावर, तो त्या हिंदू मुलीशी संपर्क साधायचा.

तो गोड शब्दांनी संभाषण सुरू करायचा, आणि मग हळूहळू व्हिडिओ कॉलवर यायचा. प्रेमाचे वचन देऊन तो मुलींना व्हिडिओ कॉलवर विवस्त्रही व्हायला लावायचा. रेहानने पोलिसांना सांगितले की, तो मुलींशी दोन-तीन वेळा संपर्क साधायचा. ज्या मुली त्याच्या जाळ्यात अडकायच्या, त्यांना तो लक्ष्य करायचा. ज्या अडकायच्या नाहीत, त्यांच्यापासून तो दूर राहायचा. “ज्या मुली माझ्या जाळ्यात अडकायच्या, त्यांना मी बांकेधामच्या डोंगरांवर घेऊन जायचो. लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी, मी लैंगिक शक्ती वाढवणारी औषधे द्यायचो.”

हेही पाहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post