ठाणे
कौटुंबिक प्रगती खुंटल्याचे आणि नातेवाईकाने 'करणी' (ब्लॅक मॅजिक) केल्याचे सांगून एका भोंदू बाबाने ठाण्यातील एका कुटुंबाला तब्बल १ कोटी ६६ लाख रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी मुंबईतील अंधेरी येथे राहणाऱ्या मंजुनाथ शेट्टी याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.(Crime News)
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार कुटुंब आणि आरोपी मंजुनाथ शेट्टी यांची जानेवारी २०२४ मध्ये एका कार्यक्रमात भेट झाली होती. यावेळी कुटुंबाने त्यांच्या आर्थिक अडचणींबाबत शेट्टीला सांगितले. याचाच फायदा घेत शेट्टीने त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांच्यावर ‘करणी’ केली असून, त्यामुळेच त्यांची प्रगती थांबली असल्याची भीती त्यांच्या मनात भरवली होती.(Crime News)
( – Veer Savarkar - बॅरी द्वंद्वयुद्ध )
ही करणी दूर करण्यासाठी भोंदू बाबाने कुटुंबाला १२ ज्योतिर्लिंगांची यात्रा आणि विविध धार्मिक विधी करण्यास भाग पाडले.फेब्रुवारी ते एप्रिल २०२४ दरम्यान, विधींचे साहित्य खरेदी करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने पीडित व्यक्तीकडून १० लाख रुपये रोख तसेच मे २०२४ ते जानेवारी २०२६ या काळात पीडित कुटुंबाने आरोपी आणि त्याच्या आईच्या बँक खात्यात तब्बल १.५६ कोटी रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. आरोपीने आपल्यावर काही न्यायालयीन खटले सुरू असल्याचे सांगून पैशांची मागणी केली. “जर मला जेल झाली तर तुमचे विधी अपूर्ण राहतील आणि तुमचे कधीच चांगले होणार नाही,” अशी भीती त्याने कुटुंबाला घातली होती.(Crime News)
कुटुंबातील किरकोळ अपघातांचा गैरफायदा घेऊन आरोपी त्यांना सतत लुटत राहिला. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कुटुंबाने पोलिसात धाव घेतली. कासारवडवली पोलिसांनी २ एप्रिल रोजी मंजुनाथ शेट्टीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३१८ आणि महाराष्ट्र नरबळी व इतर अमानवीय, अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा, २०१३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.(Crime News)
याप्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, पोलीस अधिक तपास करत आहेत.(Crime News)
