स्कॉटलंडमधील सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेदरम्यान (Commonwealth Games 2026) ग्लासगो येथे एका भारतीय रेस्टॉरंटमध्ये वापरण्यात आलेल्या भारताच्या अपूर्ण नकाशामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
भारतीय महिला बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन (Lovlina Borgohain)यांनी रेस्टॉरंटमध्ये वापरण्यात आलेल्या नॅपकिनवर छापलेल्या भारताच्या नकाशात ईशान्य भारत आणि काश्मीर दाखवले नसल्याचा आरोप करत तीव्र आक्षेप नोंदवला आहे.(CWG 2026 Lovlina Borgohain Glasgow India Map Controversy)
ग्लासगोतील ‘मिस्टर सिंग्स इंडिया - द होम ऑफ करी’ या रेस्टॉरंटमध्ये कॉमनवेल्थ स्पर्धेत (Commonwealth Games 2026) यश मिळवलेल्या भारतीय खेळाडूंसाठी विशेष भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी वापरण्यात आलेल्या कागदी नॅपकिनवरील भारताच्या अपूर्ण नकाशामुळे हा वाद उफाळून आला. हा नकाशा पाहताच लव्हलिना आणि बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडिया (BFI) चे अध्यक्ष अजय सिंह यांनी तीव्र आक्षेप नोंदवला.(CWG 2026 Lovlina Borgohain Glasgow India Map Controversy)
ईशान्य भारत आणि काश्मीरचा भाग नकाशातून गायब
लव्हलिना यांनी नॅपकिनवरील नकाशा नीट पाहिल्यानंतर त्यात भारताचा ईशान्येकडील संपूर्ण भाग दाखवलेला नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडे याबाबत आक्षेप नोंदवत, भारताचा प्रत्येक भाग हा देशाचा अविभाज्य घटक असून नकाशात तो संपूर्णपणे दाखवला गेला पाहिजे, असे स्पष्ट केले.
त्याचवेळी उपस्थित असलेले BFI अध्यक्ष अजय सिंह यांनीही या चुकीवर कठोर नाराजी व्यक्त करत नकाशा तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, नकाशामध्ये जम्मू-काश्मीरचाही योग्य प्रकारे समावेश करण्यात आलेला नव्हता. मात्र, आक्षेप घेतल्यानंतरही रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा निवेदन जारी करण्यात आलेले नाही.(CWG 2026 Lovlina Borgohain Glasgow India Map Controversy)
भारतीय बॉक्सिंग संघाची ऐतिहासिक कामगिरी
२०२६ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय बॉक्सिंग संघाने दमदार कामगिरी करत एकूण १० पदकांची कमाई केली. यात ७ सुवर्ण आणि ३ रौप्यपदकांचा समावेश आहे. राष्ट्रकुल स्पर्धांच्या इतिहासात भारतीय बॉक्सिंग संघाची ही आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी मानली जात आहे.(CWG 2026 Lovlina Borgohain Glasgow India Map Controversy)

