Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

डिझेलच्या खर्चाला कायमचा टाटा! देशात पहिली Electric Boat 'Vikalpika' समुद्रात मासेमारीसाठी सज्ज

जागतिक बाजारपेठेतील अनिश्चितता आणि पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा खनिज तेलाचे (Crude mineral oil) दर गगनाला भिडले आहेत. याचा थेट फटका किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसायाला बसत असून डिझेल आणि पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे मच्छिमारांचा नफा घटत आहे.

या गंभीर समस्येवर मात करण्यासाठी भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) केंद्रीय मत्सव्यवसाय तंत्रज्ञान संस्थेने (CIFT) एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. संस्थेच्या मुंबई संशोधन केंद्राने ‘विकल्पिका’ (Vikalpika) नावाची देशातील पहिली विद्युत शक्तीवर चालणारी मासेमारी बोट विकसित केली असून, ती पारंपरिक नौकांना एक उत्तम आणि स्वस्त पर्याय म्हणून पुढे आली आहे. (Electric Boat Vikalpika)

धूर, आवाज कमी करणारी नवी बोट

या बोटीमुळे धूर, आवाज आणि कंपन कमी होत असल्याने मासेमारांना अधिक स्वच्छ आणि सुरक्षित कार्यपरिसर उपलब्ध होऊ शकतो. तसेच कार्बन उत्सर्जनात घट होऊन पर्यावरणपूरक मासेमारीला चालना मिळण्याची शक्यता आहे. लहान आणि पारंपरिक मच्छिमारांसाठी इंधन खर्च हा मासेमारी व्यवसायातील सर्वांत मोठा खर्च मानला जातो. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा थेट परिणाम मासेमारीच्या अर्थकारणावर आणि मच्छिमारांच्या उत्पन्नावर होत असतो. अशा परिस्थितीत इलेक्ट्रिक आणि हायब्रिड ऊर्जा प्रणालीवर आधारित ‘विकल्पिका’ ही बोट इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, अशी माहिती आयसीएआर-सीआयएफटीकडून देण्यात आली. ( Electric Boat ‘Vikalpika’)

‘विकल्पिका’ ही केवळ प्रायोगिक संकल्पना नसून प्रत्यक्ष वापरासाठी विकसित करण्यात आलेले तंत्रज्ञान असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. बंदर परिसरातील हालचाल, किनारपट्टीलगतची मासेमारी तसेच कमी वेगातील मासेमारी मोहिमांसाठी ही बोट उपयुक्त ठरू शकते. यामुळे पेट्रोल-डिझेलचा वापर कमी होऊन मासेमारीचा खर्च घटण्यास मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

भविष्यात इलेक्ट्रिक किंवा हायब्रिड मासेमारी चोटींसाठी स्वतंत्र धोरण तयार करणे, सौरऊर्जेवर आधारित चार्जिंग व्यवस्था उभारणे, बंदरांमध्ये चार्जिंग स्टेशन विकसित करणे, बैटरी सुरक्षिततेचे निकष निश्चित करणे आणि मच्छिमारांना प्रशिक्षण देणे यासाठीही ‘विकल्पिका’ मार्गदर्शक ठरू शकते, असे तत्क्षांचे मत आहे. विशेषतः अल्प कालावधीच्या किनारी मासेमारीसाठी हे तंत्रज्ञान अधिक उपयुक्त उरू शकते. पुढोल चाचण्या व संशोधनातून विविध प्रकारच्या बोटी, मासेमारीची साधने व किनारी परिस्थितीनुसार संधी उपलब्ध होणार असल्याचेही या प्रणालीत सुधारणा करण्याची सांगण्यात आले.

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post