Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
डोंबिवलीत 'राष्ट्रप्रेमी Gen Z'चे संमेलन उत्साहात संपन्न; Dimagi Naxal वर स्वानंद गांगल यांचे मार्गदर्शन

डोंबिवलीत 'राष्ट्रप्रेमी Gen Z'चे संमेलन उत्साहात संपन्न; Dimagi Naxal वर स्वानंद गांगल यांचे मार्गदर्शन

'राष्ट्रीय स्वयंसेवक संघा'च्या डोंबिवलीतील बाजीप्रभू नगर शाखेच्या वतीने निवडक महाविद्यालयीन विद्यार्थी आणि युवा वर्गासाठी आयोजित करण्यात आलेले 'राष्ट्रप्रेमी Gen Z ची भारत सन्मान सभा' हे युवा संमेलन नुकतेच पार पडले.

राष्ट्रकार्यात युवकांचा सहभाग वाढविणे, देशाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या तरुणांची ओळख करून देणे आणि समकालीन सामाजिक विषयांवर युवकांशी संवाद साधणे, हा या संमेलनाचा उद्देश होता. (Dombivli Youth Convention: Swanand Gangal Speaks on Dimagi Naxal)

कार्यक्रमात प्रश्नमंजुषा, नाटिका तसेच समाजमाध्यमांशी संबंधित चर्चासत्र घेण्यात आले. संमेलनाचे प्रमुख वक्ते स्वानंद गांगल यांनी 'डिकोडिंग दिमागी नक्षल' या विषयावर मार्गदर्शन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात 'दिमागी नक्षल' या संकल्पनेबाबत व्यक्त केलेल्या चिंतेच्या पार्श्वभूमीवर गांगल यांनी या विषयाची मांडणी केली. सशस्त्र नक्षलवादाविरोधातील कारवाईनंतरही विचारांच्या माध्यमातून समाजात संभ्रम, दिशाभूल किंवा अराजकतेची भावना निर्माण करण्याच्या प्रयत्नांबाबत सजग राहण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. माहितीचे चिकित्सक विश्लेषण करणे आणि कोणत्याही विचारसरणीचा स्वीकार करण्यापूर्वी उपलब्ध तथ्यांचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर समाजमाध्यमांच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर माहितीची सत्यता तपासण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.(Dombivli Youth Convention: Swanand Gangal Speaks on Dimagi Naxal)

संमेलनाच्या समारोपप्रसंगी बाजीप्रभू नगर शाखेचे कार्यवाह अक्षय फाटक यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती दिली. युवकांनी राष्ट्रकार्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन करताना केवळ समाजमाध्यमांवर व्यक्त होण्यापेक्षा प्रत्यक्ष समाजात जाऊन सकारात्मक काम करण्यासाठी वेळ देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. समाजातील विविध प्रश्न समजून घेऊन त्यावर कृतीशील पद्धतीने काम करण्यासाठी युवकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन फाटक यांनी केले. विविध उपक्रम आणि मार्गदर्शनामुळे युवा संमेलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.(Dombivli Youth Convention: Swanand Gangal Speaks on Dimagi Naxal)

हेही पाहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post