भारतीय संरक्षण आणि संशोधन क्षेत्रासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. देशाच्या सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) एका नवीन आणि अत्यंत उच्च क्षमतेच्या बॉम्बची यशस्वी चाचणी (DRDO Bomb Test) घेतली आहे.
ही चाचणी हरियाणा (Haryana) राज्यातील पंचकुला जिल्ह्यात (Panchkula District) असलेल्या एका विशेष प्रयोगशाळेत पार पडली. या यशामुळे भारताचे लष्करी सामर्थ्य आणि शत्रूला चोख प्रत्युत्तर देण्याची ताकद अनेक पटींनी वाढली आहे. (DRDO Bomb Test)
घरीच थांबण्याचा सल्ला संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेची (DRDO) एक प्रमुख प्रयोगशाळा असलेल्या टर्मिनल बॅलिस्टिक्स रिसर्च लॅबोरेटरीने (TBRL) रविवारी हरियाणाच्या पंचकुला जिल्ह्यातील रामगढ चाचणी केंद्रावर बॉम्बची चाचणी (haryana bomb test) केली. या चाचणीच्या पार्श्वभूमीवर, पंचकुला जिल्ह्यातील भानू आणि बिल्ला गावातील रहिवाशांना चाचणीच्या वेळेत घरातच थांबण्याचा सल्ला देण्यात आला होता. (DRDO Bomb Test)
सुरक्षा क्षेत्र निश्चित करण्यात आले
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, स्फोटकाच्या चाचणी दरम्यान बॉम्बचे तुकडे अंदाजे १.५ किलोमीटर उंचीवर तसेच चाचणी झालेल्या स्थळापासून २ किलोमीटरपर्यंत आडव्या दिशेने पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे चाचणी सुरक्षितपणे पार पडावी यासाठी चाचणी झालेल्या स्थळाभोवती दोन किलोमीटरचे सुरक्षा क्षेत्र तयार करण्यात आले होते.
पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञानहा उच्च क्षमतेचा बॉम्ब संपूर्णपणे भारतीय तंत्रज्ञानाचा वापर करून देशातच विकसित करण्यात आला आहे. यामुळे भारताचे परदेशी शस्त्रास्त्रांवरील अवलंबित्व कमी होण्यास मोठी मदत होणार आहे. या नव्या यशामुळे भारतीय हवाई दल (Indian Air Force) आणि भूदलाची ताकद (Indian Army) वाढणार असून, कोणत्याही कठीण परिस्थितीत शत्रूचे बंकर किंवा तळ उद्ध्वस्त करण्यासाठी या स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकतो. संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
