Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
FIFA Friendly, Ind vs Bra : भारताला ब्राझीलबरोबर मैत्रीपूर्ण सामना खेळण्याची संधी; कधी, कुठे होणार हा सामना

FIFA Friendly, Ind vs Bra : भारताला ब्राझीलबरोबर मैत्रीपूर्ण सामना खेळण्याची संधी; कधी, कुठे होणार हा सामना

  • ऋजुता लुकतुके

भारतीय फुटबॉलसाठी ऐतिहासिक ठरणारी मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि पाच वेळचे फिफा विश्वचषक विजेते ब्राझील यांच्यातील आंतरराष्ट्रीय मैत्रीपूर्ण सामना(FIFA Friendly, Ind vs Bra)अधिकृतपणे ठरला आहे.

३ ऑक्टोबर २०२६ रोजी कोलकात्यातील विवेकानंद युवा भारती क्रीडांगण (सॉल्ट लेक स्टेडियम) येथे हा सामना खेळवण्यात येणार असल्याची घोषणा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने (AIFF) केली आहे.(FIFA Friendly, Ind vs Bra)

फिफा आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग म्हणून हा सामना खेळवण्यात येईल. भारतीय फुटबॉलच्या इतिहासातील सर्वात मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांपैकी एक असा हा सामना आहे. १९९२मध्ये फिफा जागतिक क्रमवारी सुरू झाल्यानंतर भारताला मिळालेला हा सर्वात उच्च दर्जाचा प्रतिस्पर्धीठरणार आहे.(FIFA Friendly, Ind vs Bra)

ब्राझील हा जगातील सर्वात यशस्वी फुटबॉल देशांपैकी एक असून, त्यांच्या नावावर पाच फिफा विश्वचषक विजेतेपदे आहेत. भारताच्या ब्लू टायगर्ससंघाला अशा बलाढ्य प्रतिस्पर्ध्याविरुद्ध खेळण्याची संधी मिळणे ही भारतीय फुटबॉलसाठी मोठी उपलब्धी मानली जात आहे.(FIFA Friendly, Ind vs Bra)

( – Maharashtra Weather Today : आभाळ फाटलं, नद्यांना पूर! परिस्थिती गंभीर झाल्याने 'या' जिल्ह्यांत शाळा बंद; वाचा हवामान खात्याचा इशारा काय ? )

गेल्या काही दिवसांपासून ब्राझीलच्या भारत दौऱ्याबाबत चर्चा सुरू होती. कोलकात्यात हा सामना आयोजित करण्यासाठी भारतीय आयोजक आणि ब्राझील फुटबॉल महासंघ (CBF) यांच्यातील चर्चा अंतिम टप्प्यात असल्याचे वृत्त समोर आले होते. आता AIFFने अधिकृत घोषणा करत सामना निश्चित केला आहे.(FIFA Friendly, Ind vs Bra)

कोलकात्यातील सॉल्ट लेक स्टेडियम हे भारतीय फुटबॉलमधील सर्वात प्रतिष्ठित मैदानांपैकी एक मानले जाते. या मैदानावर यापूर्वी अनेक मोठे आंतरराष्ट्रीय सामने आणि स्पर्धा झाल्या आहेत. भारत-ब्राझील सामन्यासाठी प्रचंड प्रेक्षक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(FIFA Friendly, Ind vs Bra)

या सामन्यामुळे भारतीय फुटबॉलला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे व्यासपीठ मिळणार आहे. भारताच्या युवा खेळाडूंना जागतिक दर्जाच्या संघाविरुद्ध खेळण्याचा अनुभव मिळेल, तर भारतीय फुटबॉलच्या वाढत्या लोकप्रियतेलाही यामुळे मोठी चालना मिळण्याची शक्यता आहे.(FIFA Friendly, Ind vs Bra)

भारतीय फुटबॉल चाहत्यांसाठी ३ ऑक्टोबर २०२६ हा दिवस आता विशेष ठरणार असून, ब्लू टायगर्स आणि ब्राझील यांच्यातील ही ऐतिहासिक लढत भारतीय फुटबॉलच्या नव्या पर्वाची सुरुवात मानली जात आहे.(FIFA Friendly, Ind vs Bra)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post