मुंबईतील दादर येथे महानगर गॅसच्या (Gas) पाईपलाईनला गळती लागली आहे. त्यामुळे आकाशात मोठ्या प्रमाणावर गॅसचे फवारे उडत असून, परिसरात गॅस (Gas) पसरल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली असून, परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार महानगर गॅसच्या (Gas) पाईप लाईनला ही गळती दादरमधील अमरहिंद मंडळ परिसरात लागली आहे. महानगरपालिका प्रशासनाकडून झाडाचा बुंधा काढण्याचे काम करत असताना जेसीबीचा धक्का गॅसच्या (Gas) पाईपलाईनला लागून ही पाईप लाईन फुटली आणि त्यामधून गॅसची मोठ्या प्रमाणावर गळती झाली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी गोखले मार्गावरची वाहतूक रोखून धरली आहे. (Gas)
