Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Glasgow: भारताच्या नकाशातून 'नॉर्थ ईस्ट' गायब, स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनचा संताप

Glasgow: भारताच्या नकाशातून 'नॉर्थ ईस्ट' गायब, स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेनचा संताप

ग्लासगो येथे सुरू असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारतातल्या मुष्टियोद्धयांनी ऐतिहासिक कामगिरी करत ७ सुवर्णांसह १० पदकांची लयलूट केली. बॉक्सिंग रिंगमध्ये प्रतिस्पर्ध्याना धूळ चाखायला लावणारे खेळाडू रिंगबाहेरही सतर्क असल्याची प्रचिती आली आहे.

राष्ट्रकुलमध्ये रौप्यपदक जिंकणारी स्टार बॉक्सर लव्हलिना बोरगोहेन हिने ग्लासगोतील एका रेस्टॉरंटमध्ये भारताचा अपूर्ण नकाशा असलेला नॅपकिन पाहिला. या नकाशावर नॉर्थ ईस्टचा भाग दाखवण्यात आला नव्हता. त्यामुळे संतापलेल्या लव्हलिनाने आणि बॉक्सिग फेडरेशन ऑफ इंडियाने तीव्र आक्षेप घेतला आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत मिळालेल्या यशानंतर भारतीय खेळाडू ग्लासगोतील अत्यंत लोकप्रिय असलेल्या ‘मिस्टर सिंग्स इंडिया b’ या रेस्टॉरंटमध्ये रात्रीच्या जेवणासाठी गेले होते. मात्र, तिथे टेबलवर ठेवलेल्या नॅपकिनवर नजर पडताच आनंदाचे वातावरण अचानक तापले. रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर छापलेल्या भारताच्या नकाशातून नॉर्थ ईस्टचा भाग गायब असल्याचे लव्हलिनाच्या लक्षात आले.

Pimpri Suicide Incident : कोळशाचा धूर अन् विषारी औषध प्राशन! पिंपरीत कुटुंबाचा जीवन संपवण्याचा प्रयत्न; नेमकं काय कारण?

रेस्टॉरंटच्या नॅपकिनवर छापलेल्या भारताच्या नकाशातून नॉर्थ ईस्ट पूर्णपणे गायब आहे. भारताचा प्रत्येक भाग आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. जगातील कोणत्याही कोपऱ्यात देशाचा संपूर्ण आणि योग्य नकाशाच दाखवला गेला पाहिजे, असे लव्हलिना हिने म्हटले. बॉक्सिंग महासंघाचे अध्यक्ष अजय सिंह यांनीही या प्रकरणी आक्षेप तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त दिले आहे.

नॉर्थ ईस्टच नाही, तर जन्मू-कश्मीरचा भागही चुकीच्या पद्धतीने दाखवला
नकाशात केवळ नॉर्थ ईस्टच नाही, तर जम्मू-काश्मीरचा भागही चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आला होता, असे अजय सिंह यांनी निदर्शनास आणून दिले. अजय सिंह यांनी रेस्टॉरंट व्यवस्थापनाकडे हे वादग्रस्त नॅपकिन्स त्वरित हटवून योग्य नकाशा वापरण्याची मागणी केली. परदेशात हिंदुस्थानी संस्कृती आणि ओळखीचा प्रसार करणाऱ्या कोणत्याही ठिकाणी देशाच्या सन्मानाशी संबंधित अशा चुका अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत, असा इशाराही त्यांनी दिला.

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post