Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

'गोकुळ'चे 'हलाल प्रमाणपत्र' तत्काळ रद्द करा; कोल्हापुरात Hindu Janajagruti Samiti आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना आक्रमक

Hindu Janajagruti Samiti महाराष्ट्राची ओळख असलेल्या 'गोकुळ' (कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ) दूध संघाने धर्माधारित 'हलाल' प्रमाणपत्र घेतल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे.

हे हलाल प्रमाणपत्र तत्काळ रद्द न केल्यास उत्पादनांवर बहिष्कार घालण्यासह तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल. तसेच वेळ पडली, तर थेट 'गोकुळ'वर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी दिला आहे. या मागणीचे सविस्तर निवेदन संघटनांच्या प्रतिनिधींनी गोकुळचे प्रशासकीय मंडळाला, तसेच कोल्हापुरचे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार अशोक माने यांना दिले. एका धर्मनिरपेक्ष देशात शासकीय प्रमाणपत्रांना डावलून घेतलेल्या या निर्णयामुळे बहुसंख्य हिंदू ग्राहकांच्या भावना दुखावल्या गेल्या असून प्रशासनाने याची तातडीने दखल घेऊन हे प्रमाणपत्र रहित करावे, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली. या वेळी कार्यकत्यांनी गोकुळच्या हलाल प्रमाणपत्राची प्रत जाळली. (Hindu Janajagruti Samiti)

आखाती देशांमध्ये उत्पादने निर्यात करण्यासाठी या प्रमाणपत्राची सक्ती असल्याचे कारण गोकुळ प्रशासनाकडून दिले जात असले, तरी हा अट्टाहास पूर्णतः अनाकलनीय आहे. देशांतर्गत आणि राज्यातच गोकुळच्या दुधाला मोठी मागणी असतांना अद्याप संपूर्ण भारतात दूध पोहोचले नसताना केवळ मुस्लिम देशांनाच उत्पादने विकण्याची घाई का केली जात आहे? असा सवाल उपस्थित होत आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारत सरकारचे 'भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण' (FSSAI) तसेच 'अन्न व औषध प्रशासन' (FDA) यांसारख्या अधिकृत शासकीय संस्था अस्तित्वात असताना वेगळ्या धर्माधारित प्रमाणपत्राची आवश्यकताच काय? हा देशाच्या धर्मनिरपेक्ष राज्यघटनेचा आणि शासकीय संस्थांचा अवमान आहे. हलाल प्रमाणपत्र हे बेकायदेशीर असल्यामुळे उत्तर प्रदेशात त्यावर बंदी घातलेली आहे. (Hindu Janajagruti Samiti)

हलाल प्रमाणपत्राच्या माध्यमातून देशात एक अत्यंत घातक आणि समांतर अर्थव्यवस्था उभी केली जात आहे, हे प्रमाणपत्र देणारी 'जमियत उलेमा हिंद' ही संस्था यातून मिळणाऱ्या पैशांचा वापर जिहादी आतंकवाद्यांचे खटले लढण्यासाठी करते. त्यामुळे गोकुळचे दूध पिणाऱ्या हिंदू ग्राहकांचा कष्टाचा पैसा अप्रत्यक्षरीत्या देशविघातक कारवायांसाठी आणि आतंकवाद्यांच्या सुटकेसाठी वापरला जाणार का? जर हे दूध ‘हलाल’ प्रमाणित असेल, तर त्यासाठी बहुसंख्य हिंदूंनी आपला पैसा का मोजावा? या राष्ट्रीय धोक्याची गांभीर्याने दखल घेत हे प्रमाणपत्र तत्काळ रद्द करावे आणि ज्या तत्कालीन अध्यक्ष व संचालक मंडळाच्या काळात हा निर्णय झाला त्यांची सखोल चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. (Hindu Janajagruti Samiti)

या वेळी गोकुळच्या प्रशासकांनी या संपूर्ण प्रकरणावर प्रशासकीय मंडळाच्या आगामी बैठकीत सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन शिष्टमंडळाला दिले आहे. या गंभीर विषयावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी कोल्हापुरातील विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने एकत्र आले होते. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे शिवानंद स्वामी, महाराजा प्रतिष्ठानचे निरंजन शिंदे, शिवसेना उबाठाचे राजू यादव, हिंदू एकता आंदोलनाचे गजानन तोडकर यांच्यासह बजरंग दल, मंदिर महासंघ, मराठा तितुका मेळवावा, हिंदु महासभा, मानवाधिकार संघटना, पॉझिटिव्ह वॉच आणि हिंदू विधीज्ञ परिषदेचे अनेक प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (Hindu Janajagruti Samiti)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post