मुंबई
मुंबईच्या पूर्व उपनगरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून, त्याला बळजबरीने महिलांचे कपडे परिधान करायला लावून लोकल ट्रेनमध्ये भीक मागण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
या प्रकरणी गोवडीतील तृतीयपंथी गुरू माँ’ उर्फ बाबू अयान शेख ऊर्फ ज्योती याच्या विरुद्ध शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर गुरू माँ फरार असून त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.(Govandi Crime)
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगा आणि दोन्ही आरोपी एकाच परिसरात राहणारे असून त्यांची जुनी ओळख होती. काही काळापूर्वी मुलाच्या वागण्या बोलण्यात आणि चालण्याच्या पद्धतीत बदल झाल्याचे आईच्या लक्षात आले होते. त्यामुळे आईने खबरदारी म्हणून मुलाला उत्तर प्रदेशातील त्यांच्या मूळ गावी पाठवले होते. मात्र, आरोपींचा डोळा या मुलावरच होता. त्यांनी चक्क उत्तर प्रदेशात जाऊन मुलाचा शोध घेतला आणि त्याला फूस लावून पुन्हा मुंबईत आणले.(Govandi Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत आणल्या नंतर या मुलाचे मोठ्या प्रमाणावर शोषण करण्यात आले. आरोपींनी त्याचे मुलाचे मूळ रूप बदलून त्याला वेगळे कपडे (महिलांचे पेहराव) घालण्यास भाग पाडले, लोकल ट्रेनमध्ये प्रवाशांकडे भीक मागण्यासाठी जबरदस्ती केली.इतकेच नव्हे तर, ग्राहकांना अनैसर्गिक संबंधांसाठी प्रवृत्त करण्यास लावून त्यातून मिळणारे सर्व पैसे आरोपी स्वत: हडप करत असतं.(Govandi Crime)
( – Iran Tensions : मध्यपूर्वेतील तणावाच्या क्षणी रशिया भारताच्या मदतीला, अतिरिक्त तेल विकण्याची तयारी )
मुलाचा शोध घेत असताना पीडित मुलाची आई जेव्हा आरोपींच्या घरी पोहोचली, तेव्हा तिला आपला मुलगा पूर्णपणे बदललेल्या वेशभूषेत आढळला. मुलाची अवस्था पाहून आईने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. “मुलाला शारीरिक इजा झाली असावी असा आम्हाला संशय आहे, त्यामुळे त्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे,” अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली.(Govandi Crime)
पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि ‘पोक्सो’ (POCSO) कायद्यांतर्गत अत्यंत कडक कलमे लावली आहेत. भारतीय न्याय संहिता कलम १३९ (भीक मागण्यासाठी अपहरण) करणे. कलम १४२ (बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे),पोक्सो कायदा कलम ४, ६, ८ आणि १२ (लैंगिक अत्याचार आणि छळ),तृतीयपंथी व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) कायदा, २०१९ अन्वये देखील गुन्हा नोंदवण्यात आला आहे.(Govandi Crime)
“तपास सध्या प्राथमिक टप्प्यावर आहे. वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतर या गुन्ह्यातील गांभीर्य आणि शोषणाचे स्वरूप अधिक स्पष्ट होईल,” असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. या घटनेमुळे उपनगरात खळबळ उडाली असून मानवी तस्करी आणि अल्पवयीन मुलांच्या शोषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.(Govandi Crime)
हेही पहा –
