Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

Hardik Pandya : ४ कोटी फॉलोअर्स असलेलं इन्स्टाग्राम अकाऊंट हार्दिकने अचानक का बंद केलं?

  • ऋजुता लुकतुके

मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने(Hardik Pandya)अचानक आपले इन्स्टाग्राम अकाउंट हटवल्याने क्रिकेटविश्वात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई इंडियन्सच्या अत्यंत निराशाजनक आयपीएल २०२६ मोहिमेनंतर हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.(Hardik Pandya)

हार्दिक पांड्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर ४ कोटींहून अधिक फॉलोअर्स होते. मात्र बुधवारी सायंकाळी त्याचे अकाउंट उघडण्याचा प्रयत्न केल्यास "Sorry, this page isn’t available" असा संदेश दिसत होता. यानंतर सोशल मीडियावर विविध चर्चा आणि अंदाज सुरू झाले. काही चाहत्यांनी मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीमुळे पांड्या मानसिक दबावाखाली असल्याचे म्हटले, तर काहींनी संघ व्यवस्थापनाशी मतभेद असल्याची शक्यता व्यक्त केली.(Hardik Pandya)

( – Central Railway: एसी लोकलचा नवा रेकॉर्ड! जानेवारी ते मे दरम्यान १.५० कोटी मुंबईकरांनी घेतली थंडगार प्रवासाची अनुभूती )

आयपीएल २०२६ मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी अत्यंत खराब झाली. पाच वेळच्या विजेत्या संघाला १४ पैकी केवळ ४ सामने जिंकता आले आणि गुणतालिकेत नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. वैयक्तिक पातळीवरही हार्दिकचा हंगाम निराशाजनक ठरला. त्याने ८ डावांत फक्त १४६ धावा केल्या, तर गोलंदाजीत केवळ ३ विकेट्स मिळवल्या.(Hardik Pandya)

माजी क्रिकेटपटू वसिम जाफरने हार्दिकला पुढील हंगामात मुंबई इंडियन्सचे नेतृत्व देऊ नये, असे मत व्यक्त केले. "त्याला कर्णधारपदाच्या दबावातून मुक्त करून त्याच्या वैयक्तिक खेळावर लक्ष केंद्रित करू द्यावे," असे जाफरने म्हटले.(Hardik Pandya)

दरम्यान, काही तासांनंतर हार्दिक पांड्याचे इन्स्टाग्राम अकाउंट पुन्हा सुरू झाल्याचे दिसून आले. मात्र अकाउंट अचानक गायब होण्यामागचे नेमके कारण काय होते, याबाबत हार्दिककडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.(Hardik Pandya)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post