ऋजुता लुकतुके
आयकर विवरणपत्र (ITR) भरण्याच्या ३१ जुलै २०२६ या अंतिम मुदतीला अवघे दोन दिवस शिल्लक असताना करदात्यांची विवरणपत्र भरण्यासाठी झुंबड उडाली आहे. अशावेळी ज्यांनी अजून विवरणपत्र भरलेलं नाही, त्यांना कर तज्ज्ञांनी सोपा मार्ग सुचवला आहे.
त्यांच्या मते, योग्य कागदपत्रे तयार असतील आणि उत्पन्नाची माहिती आधीच पडताळलेली असेल, तर अनेक पगारदार करदाते फक्त १० मिनिटांत आयटीआर दाखल करू शकतात.(Income Tax Return Filing Deadline)
आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलवरील प्री-फिल्ड (pre-filled) डेटा आणि फॉर्म १६, फॉर्म २६एएस, AIS (Annual Information Statement) आणि TIS (Taxpayer Information Summary) यांचा योग्य वापर केल्यास आयटीआर भरण्याची प्रक्रिया खूप जलद होऊ शकते.(Income Tax Return Filing Deadline)
तज्ज्ञांनी सांगितले की, आयटीआर भरण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी तयार ठेवाव्यात. त्यामध्ये PAN, आधार क्रमांक, फॉर्म १६, बँक खात्याची माहिती, गुंतवणुकीचे तपशील आणि AIS व फॉर्म २६एएसमधील माहितीची पडताळणी यांचा समावेश आहे. ही सर्व माहिती जुळत असल्यास प्री-फिल्ड रिटर्न स्वीकारून आवश्यक बदल करून रिटर्न सादर करता येतो.(Income Tax Return Filing Deadline)
( – Pak Cricketers Punished : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेनंतर दोन पाक खेळाडूंवर आयसीसीची गाज )
सोप्या पद्धतीने आयटीआर भरण्यासाठी तज्ज्ञांनी पुढील क्रम सुचवला आहे. ई-फायलिंग पोर्टलवर लॉगिन करावे, योग्य ITR-1 किंवा ITR-2 फॉर्म निवडावा, प्री-फिल्ड माहिती तपासावी, फॉर्म १६शी उत्पन्नाची तुलना करावी, आवश्यक वजावटी (80C, 80D इत्यादी) तपासाव्यात, बँक खात्याची माहिती पडताळावी, रिटर्न सबमिट करून ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करावे.(Income Tax Return Filing Deadline)
मात्र तज्ज्ञांनी एक महत्त्वाचा इशाराही दिला आहे. १० मिनिटांत आयटीआर भरणे शक्य असले, तरी घाईत चुका करू नयेत. चुकीचा आयटीआर फॉर्म निवडणे, AIS व फॉर्म २६एएसशी माहिती न जुळवणे, सर्व उत्पन्न जाहीर न करणे, बँक तपशील चुकीचा देणे किंवा ई-व्हेरिफिकेशन विसरणे या चुका पुढे नोटीस, रिफंडमध्ये विलंब किंवा रिटर्न अवैध ठरण्याचे कारण ठरू शकतात.(Income Tax Return Filing Deadline)
करतज्ज्ञांच्या मते, शेवटच्या क्षणी पोर्टलवर वाढणारी गर्दी आणि तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आजच आयटीआर दाखल करणे अधिक सुरक्षितआहे. विशेषतः पगारदार करदात्यांसाठी प्रक्रिया आता पूर्वीपेक्षा खूप सोपी झाली असली, तरी अचूकता आणि पडताळणी यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.(Income Tax Return Filing Deadline)
अंतिम मुदतीची वाट पाहण्यापेक्षा आवश्यक कागदपत्रे तयार ठेवून प्री-फिल्ड डेटा तपासावा आणि वेळेत आयटीआर दाखल करून ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.(Income Tax Return Filing Deadline)
हेही पहा –

