Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Ind vs SL, Test Series : कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ लंकेत दाखल, 'या' स्टार खेळाडूविषयी प्रश्नचिन्ह

Ind vs SL, Test Series : कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ लंकेत दाखल, 'या' स्टार खेळाडूविषयी प्रश्नचिन्ह

  • ऋजुता लुकतुके

श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी(Ind vs SL, Test Series)भारतीय क्रिकेट संघ कोलंबो येथे दाखल झाला असला, तरी युवा फलंदाज साई सुदर्शन संघासोबत नसल्याने त्याच्या उपलब्धतेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

भारतीय संघ सोमवारी कोलंबो येथे पोहोचला, मात्र सुदर्शनने संघासोबत प्रवास केला नसल्याचं समोर आलं आहे. त्याच्या अनुपस्थितीमुळे पहिल्या कसोटीत त्याच्या सहभागाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(Ind vs SL, Test Series)

भारतीय संघाला यापूर्वीच वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. डाव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे बुमराह संपूर्ण कसोटी मालिकेतून बाहेर पडला असून, त्याच्या जागी जम्मू-काश्मीरचा २९ वर्षीय वेगवान गोलंदाज आकिब नबी याची संघात निवड करण्यात आली आहे.(Ind vs SL, Test Series)

साई सुदर्शनच्या अनुपस्थितीमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मात्र त्याला तंदुरुस्तीशी संबंधित काही समस्या असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय संघ व्यवस्थापन त्याच्या फिटनेसवर लक्ष ठेवून असून, वैद्यकीय पथकाकडून अंतिम परवानगी मिळाल्यानंतरच तो श्रीलंकेत दाखल होण्याची शक्यता आहे.(Ind vs SL, Test Series)

( – Gen Z Banner : आंदोलनानंतर मुंबईत अचानक झळकले 'हे' बॅनर; एका संदेशाने सर्वांचेच लक्ष वेधले )

सुदर्शन उपलब्ध नसल्यास देवदत्त पडिक्कलला संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे. डावखुरा फलंदाज पडिक्कलने अलीकडेच भारत अ संघाकडून श्रीलंका अ विरुद्धच्या सामन्यांत ६७ आणि ९४ धावांची उल्लेखनीय खेळी केली होती. त्यामुळे संघ व्यवस्थापन त्याच्याकडे पर्याय म्हणून पाहत असल्याचे मानले जात आहे.(Ind vs SL, Test Series)

भारत-श्रीलंका कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून गॉल येथे सुरू होणार आहे, तर दुसरी कसोटी २३ ऑगस्टपासून कोलंबो येथे खेळवली जाईल. ही मालिका आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दृष्टीने भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.(Ind vs SL, Test Series)

शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ या मालिकेत विजय मिळवून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले स्थान मजबूत करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरणार आहे. मात्र बुमराहच्या अनुपस्थितीनंतर आता साई सुदर्शनच्या फिटनेसबाबत निर्माण झालेला संभ्रम ही भारतीय संघासाठी आणखी एक डोकेदुखी ठरली आहे.(Ind vs SL, Test Series)

भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सुदर्शनच्या उपलब्धतेबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नसली, तरी पुढील काही दिवसांत त्याच्या फिटनेसबाबत अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे.(Ind vs SL, Test Series)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post