Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Indian Embassy Slams NYT : चुकीच्या शब्दावलीवर भारताचा तीव्र आक्षेप! 'पाकिस्तानी काश्मीर' म्हणणाऱ्या वृत्तपत्राची केली कानउघाडणी

Indian Embassy Slams NYT : चुकीच्या शब्दावलीवर भारताचा तीव्र आक्षेप! 'पाकिस्तानी काश्मीर' म्हणणाऱ्या वृत्तपत्राची केली कानउघाडणी

प्रसिद्ध अमेरिकन वृत्तपत्र 'द न्यूयॉर्क टाईम्स' (The New York Times) द्वारे वापरण्यात आलेल्या एका चुकीच्या आणि दिशाभूल करणाऱ्या शब्दावलीवर भारताने अत्यंत कडक शब्दांत आक्षेप नोंदवला आहे.

या वृत्तपत्राने आपल्या एका वृत्तांत शीर्षकात पाकिस्तानच्या अनधिकृत ताब्यातील भूभागाचा उल्लेख करताना 'पाकिस्तानी काश्मीर' असा प्रयोग केला होता. यावर अमेरिकेतील भारतीय दूतावासाने (Indian Embassy) सामाजिक संकेतस्थळावरून स्पष्ट शब्दांत सुनावले की, जगात 'पाकिस्तानी काश्मीर' (Pakistani Kashmir) नावाची कोणतीही संकल्पना अस्तित्वात नसून तो केवळ पाकिस्तानने बेकायदेशीरपणे व्यापलेला भारतीय भूभाग (PoK) आहे. (Indian Embassy Slams NYT)

( - १ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करा, अन्यथा…; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांचा ओला-उबरसह ॲग्रीगेटर कंपन्यांना इशारा )

जम्मू-काश्मीर आणि लडाख हा भारताचा अविभाज्य भाग भारतीय दूतावासाने (Indian Embassy) आपली भूमिका अधिक स्पष्ट करताना सांगितले की, जम्मू आणि काश्मीर तसेच लडाख हे केंद्रशासित प्रदेश भारताचा अविभाज्य आणि अक्षुण्ण भाग होते, आहेत आणि कायम राहतील. पाकिस्तानने या प्रदेशाच्या काही भागांवर बळजबरीने आणि बेकायदेशीरपणे ताबा मिळवला असून, तेथील स्थानिक नागरिकांवर सातत्याने अत्याचार व हिंसाचाराचा वापर केला जात आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी वृत्तसंकलन करताना भौगोलिक आणि कायदेशीर सत्याचा विपर्यास करणारे शब्द वापरणे थांबवले पाहिजे, असा इशारा भारताने दिला आहे. (Indian Embassy Slams NYT)

पाकिस्तानच्या दडपशाहीविरोधात जनतेचा संतापवास्तविक पाहता, या भागात स्थानिक संस्थांच्या निवडणुका आणि दडपशाहीविरोधात 'जॉइंट अवामी ॲक्शन कमिटी'च्या नेतृत्वाखाली नागरिकांचे मोठे आंदोलन सुरू आहे. पाकिस्तान सरकारच्या आर्थिक शोषण आणि दमनकारी धोरणांमुळे स्थानिक लोक रस्त्यावर उतरले असून हिंसाचारात अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे. अशा संवेदनशील आणि गंभीर मुद्द्यावर वृत्त देताना वस्तुस्थितीला धरून नसलेली भाषा वापरल्याबद्दल भारताने अमेरिकन वृत्तपत्राला चांगलेच झापले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post