Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Indian Hockey Team Orange Jersey : हॉकी संघाची नवीन जर्सी केशरी रंगांची, माजी खेळाडूंकडून होतोय विरोध

Indian Hockey Team Orange Jersey : हॉकी संघाची नवीन जर्सी केशरी रंगांची, माजी खेळाडूंकडून होतोय विरोध

  • ऋजुता लुकतुके

भारतीय हॉकी संघाची पारंपरिक निळी जर्सी बदलून ती केशरी(Indian Hockey Team Orange Jersey)करण्यात आली आहे. पण, या निर्णयावर माजी खेळाडूंनी जोरदार टीका केली आहे. माजी कर्णधार धनराज पिल्ले यांनी तर तीव्र आक्षेप घेतला आहे.

त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, "निळी जर्सी ही भारतीय हॉकीची ओळख बनली आहे."(Indian Hockey Team Orange Jersey)

हॉकी इंडियाने आगामी एफआयएच हॉकी विश्वचषक २०२६साठी भारतीय पुरुष आणि महिला संघाची प्राथमिक जर्सी नुकतीच लाँच केली. आणि तेव्हाच रंग बदलून भगवा झाल्याचं दिसलं. या निर्णयानंतर माजी खेळाडू आणि चाहत्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे.(Indian Hockey Team Orange Jersey)

धनराज पिल्ले म्हणाले की, १९२८च्या ऑलिम्पिकपासून मेजर ध्यानचंद, बलबीर सिंग सीनियर, मोहम्मद शाहिद, झफर इक्बाल आणि १९८०च्या मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या संघापर्यंत सर्वांनी निळी जर्सी घालून भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी जवळपास १५ वर्षे भारतासाठी खेळताना संघाची जर्सी नेहमी निळीच होती, असेही त्यांनी नमूद केले.(Indian Hockey Team Orange Jersey)

त्यांनी स्पष्ट केले की, "हा आयपीएल किंवा हॉकी इंडिया लीगसारखा फ्रँचायझी स्पर्धेचा प्रकार नाही. राष्ट्रीय संघाची एक परंपरा आणि ओळख असते, आणि भारतीय हॉकीची ती ओळख म्हणजे निळी जर्सी."(Indian Hockey Team Orange Jersey)

( – Ajinkya Rahane Retirement : निवृत्ती पत्करलेल्या अजिंक्यसाठी प्रशिक्षक प्रवीण आमरेंचे कौतुकोद्गार )

जर्सीचा रंग बदलण्यामागे निळ्या अॅस्ट्रो टर्फवर दृश्यमानता (visibility) सुधारण्याचे कारण दिले जात असल्याचा उल्लेख करत धनराज यांनी तो युक्तिवादही फेटाळून लावला. "आपण अनेक वर्षांपासून निळ्या टर्फवर खेळत आहोत. जर्सीमुळे कधीच अडचण आली नाही. याबाबत आंतरराष्ट्रीय संघटनेनं कोणतेही निर्देश दिले आहेत का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला.(Indian Hockey Team Orange Jersey)

धनराज यांनी १९९२च्या बार्सिलोना ऑलिम्पिकमध्ये अर्जेंटिनाविरुद्ध भारताने एकदाच पिवळा शर्ट आणि निळी शॉर्ट्स घातल्याचे आठवले; मात्र ती अपवादात्मक बाब होती. त्यांनी सांगितले की, भारतीय हॉकीतील जवळपास प्रत्येक ऐतिहासिक छायाचित्रात भारतीय खेळाडू निळ्या जर्सीतच दिसतात.(Indian Hockey Team Orange Jersey)

माजी कर्णधार परगत सिंग यांनीही या निर्णयावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, "भारतीय हॉकीची ओळख निळ्या जर्सीशी जोडलेली आहे. प्रत्येक पिढीने निळी जर्सी घालून देशाचे प्रतिनिधित्व केले आहे."(Indian Hockey Team Orange Jersey)

दरम्यान, हॉकी इंडियाने या बदलामागे तांत्रिक आणि प्रतीकात्मक कारणे असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. भगवा रंग हा तिरंग्याची शान आहे. आणि त्यासाठी रंग बदलल्याचीं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे. तथापि, धनराज पिल्ले आणि इतर माजी खेळाडूंनी परंपरा आणि ओळख जपण्यावर भर देत निळ्या जर्सीचा वारसा कायम ठेवण्याची मागणी केली आहे.(Indian Hockey Team Orange Jersey)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post