- ऋजुता लुकतुके
IPL 2026 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) धडाकेबाज फलंदाज टिम डेव्हिड (Tim David) याच्यावर आयपीएल २०२६च्या अंतिम सामन्यानंतर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. गुजरात टायटन्सविरुद्धच्या (Gujarat Titans) अंतिम सामन्यात विजय मिळवल्यानंतर अवघ्या एका दिवसात आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्याला दंड ठोठावण्यात आला.
(IPL 2026)
आयपीएल प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, टिम डेव्हिडने सामन्यादरम्यान उपकरणे आणि मैदानावरील साहित्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन केले. आचारसंहितेच्या कलम २.२ अंतर्गत त्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, त्याने आपली चूक मान्य केली आहे. त्यामुळे त्याच्यावर सामन्याच्या मानधनातील ५० टक्के रक्कम दंड म्हणून आकारण्यात आली. पण, डेव्हीवर संबंध आयपीएलमध्ये अशी कारवाई तिसऱ्यांदा झाली आहे. त्यामुळे त्याचे एकूण डीमेरिट गुण ५ झाल्यामुळे त्याला पुढील सामना आता खेळता येणार नाही. तो कुठल्याही फ्रँचाईजीबरोबर असला तरीही पुढील हंगामात पहिला सामना त्याला खेळता येणार नाही. गुजरात टायटन्सविरुद्ध सामन्याच्या दहाव्या षटकात डेव्हीने रागाच्या भरात चेंडू पंचांच्या दिशेनं फेकून मारला होता. त्याची ही कृती नियमांचा भंग करणारी आहे. (IPL 2026)
अंतिम सामन्यात टिम डेव्हिडने आरसीबीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मधल्या फळीत फलंदाजी करताना त्याने संघाचा डाव सावरण्याबरोबरच वेगवान धावा करून विजयाचा पाया मजबूत केला. विराट कोहलीच्या (Virat Kohli) नाबाद ७५ धावांच्या खेळीला त्याने चांगली साथ दिली होती. विराटचा पाय दुखावला असताना तो धावू शकत नव्हता. त्यामुळे डेव्हीने गरजेनुसार मोठे फटके मारून चौकार वसूल करण्याची भूमिका ठेवली. आणि त्यात तो यशस्वी झाला. त्याने १७ चेंडूंत २४ धावा करताना १ षटकार आणि ४ चौकार लगावले. (IPL 2026)
आयपीएलच्या निवेदनानुसार, डेव्हिडने लेव्हल-१ गुन्हा मान्य केला असून, अशा प्रकरणांमध्ये सामनाधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. त्यामुळे या प्रकरणावर पुढील सुनावणी होणार नाही.
आरसीबीने यंदा सलग दुसऱ्यांदा आयपीएल करंडक जिंकत इतिहास रचला. रजत पाटीदारच्या (Rajat Patidar) नेतृत्वाखाली संघाने संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण कामगिरी केली. टिम डेव्हिड हा त्या यशाचा महत्त्वाचा भाग ठरला. त्यामुळे विजयानंतर लगेचच त्याच्यावर झालेल्या कारवाईची क्रिकेट वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. (IPL 2026)
मात्र हा दंड संघाच्या विजयानंतरच्या आनंदावर फारसा परिणाम करणारा नसल्याचे मानले जात आहे. आरसीबीचे चाहते सध्या सलग दुसऱ्या आयपीएल विजेतेपदाच्या उत्सवात मग्न आहेत, तर टिम डेव्हिडचे नाव मैदानावरील कामगिरीसोबतच आता या शिस्तभंगाच्या कारवाईमुळेही चर्चेत आले आहे. (IPL 2026)
हेही पहा –
