ऋजुता लुकतुके
आयपीएलचा(IPL 2026)हंगाम सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. आणि अशावेळी गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार आणि भारताचा कसोटी तसंच एकदिवसीय कर्णधार शुभमन गिलच्या बाबतीत दुखापतीचा मोठा अपडेट समोर आला आहे.
आणि तो तितकासा चांगला नाही. गेल्यावर्षभरात त्याच्या मानेच्या दुखण्याने अनेकदा डोकं वर काढलं आहे. आणि तेच आताही झालंय. त्याच्या मानेचा स्नायू दुखावलाय. आणि तो ताठर झाल्यामुळे राजस्थान रॉयल्सविरुद्धचा सामना गिल खेळू शकला नाही.(IPL 2026)
गुजरात टायटन्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला मानेजवळील स्नायूंचा ताण आला आहे. त्यामुळे तो राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात खेळू शकला नाही. मात्र ही दुखापत गंभीर नसल्याचे संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे, ज्यामुळे चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.(IPL 2026)
गिलच्या दुखापतीमुळे तो आयपीएलमधून बाहेर पडणार का, असा प्रश्न अनेकांना पडला होता. मात्र, सध्याच्या माहितीनुसार तो दीर्घकाळासाठी मैदानाबाहेर राहणार नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याला काही दिवस विश्रांती देण्यात आली आहे आणि पुढील ३ ते ४ दिवसांत तो पूर्णपणे तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे.(IPL 2026)
( – Bangladeshi Infiltration : हद्दपारीनंतरही घुसखोरांची मुंबईत पुन्हा 'डंकी' एन्ट्री! )
गुजरात टायटन्ससाठी ही सकारात्मक बाब आहे, कारण गिल संघाचा मुख्य फलंदाज आणि कर्णधार आहे. त्याची अनुपस्थिती संघाच्या कामगिरीवर परिणाम करू शकते. त्यामुळे त्याचे लवकर पुनरागमन संघासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.(IPL 2026)
दरम्यान, आगामी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात गिल पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. जर तो तंदुरुस्त झाला, तर तो पुन्हा संघाचे नेतृत्व करताना दिसेल.(IPL 2026)
एकूणच, शुभमन गिलची दुखापत गंभीर नसून तो लवकरच मैदानात परतणार असल्याची शक्यता आहे. मात्र मानेची दुखापत वारंवार डोकं वर काढत असल्यामुळे ही चांगली गोष्ट नक्कीच नाही.(IPL 2026)
हेही पहा –
