ऋजुता लुकतुके
IPL Final 2026 माजी भारतीय कर्णधार अनिल कुंबळेनं रॉयल चॅलेंजर्स संघाचे जोरदार कौतुक करताना, "हा संघ आता एका खेळाडूवर अवलंबून राहिलेला नाही," असे म्हटले आहे.
आयपीएल २०२६ च्या पहिल्या पात्रता फेरीच्या सामन्यात गुजरात टायटन्सवर ९२ धावांनी दणदणीत विजय मिळवत सलग दुसऱ्या अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर कुंबळेने आरसीबीच्या सर्वांगीण खेळाचे विशेष कौतुक केले. (IPL Final 2026)
धर्मशाला येथे झालेल्या सामन्यात आरसीबीने प्रथम फलंदाजी करत ५ बाद २५४ धावांचा विक्रमी डोंगर उभारला. कर्णधार रजत पाटीदारने अवघ्या ३९ चेंडूत नाबाद ९३ धावांची खेळी केली, तर विराट कोहली आणि देवदत्त पड्डिकल यांनीही महत्त्वाचे योगदान दिले. प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सचा डाव १६२ धावांत संपुष्टात आला. (IPL Final 2026)
सामन्यानंतर बोलताना अनिल कुंबळे म्हणाला की, "आरसीबीचा सर्वात मोठा बदल म्हणजे हा संघ आता फक्त विराट कोहलीवर अवलंबून नाही. प्रत्येक सामन्यात वेगवेगळे खेळाडू पुढे येऊन जबाबदारी घेत आहेत." त्याने विशेषतः रजत पाटीदारच्या नेतृत्वाचे आणि संघातील संतुलनाचे कौतुक केले. (IPL Final 2026)
आरसीबीने गेल्या हंगामात पहिल्यांदाच आयपीएल विजेतेपद पटकावले होते आणि यंदाही संघाने तितकाच आक्रमक व आत्मविश्वासपूर्ण खेळ कायम ठेवला आहे. फलंदाजीबरोबरच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणातही संघ सातत्याने प्रभावी प्रदर्शन करत असल्याचे कुंबळेने नमूद केले. (IPL Final 2026)
विशेष म्हणजे, अनेक वर्षे आरसीबीच्या मोहिमेचा केंद्रबिंदू विराट कोहली हा होता. मात्र यंदाच्या हंगामात पाटिदार, पड्डिकल, बेथेल आणि गोलंदाजांनीही निर्णायक भूमिका बजावल्याने संघ अधिक धोकादायक बनल्याचे मत क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. रजत पाटीदारने तर नेतृत्वाचा आदर्श घालून दिला आहे. संघात स्टार खेळाडू असताना त्यांना हाताळत आणि स्वत: मैदानावर विजयी कामगिरी करत त्याने उदाहरणच डोळ्यासमोर ठेवलं आहे. (IPL Final 2026)
दरम्यान, सलग दुसऱ्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या आरसीबीसमोर आता सलग दुसऱ्यांदा आयपीएल विजेतेपद जिंकण्याची मोठी संधी आहे. अनिल कुंबळेच्या मते, "हा संघ केवळ स्टार खेळाडूंवर नव्हे, तर मजबूत संघभावनेवर चालतो आणि त्यामुळेच ते पुन्हा विजेतेपदाचे प्रबळ दावेदार ठरले आहेत." (IPL Final 2026)
