Dailyhunt

Iran-US-Israel War: "भारताशिवाय कोणीच नाही"; इराणकडून 'इंडियन डिप्लोमेसी'चे तोंडभरून कौतुक

राण आणि अमेरिका युद्ध (Iran-US-Israel War) पेटले आहे. 28 फेब्रुवारी 2026 रोजी इस्त्रायल आणि अमेरिकेने मोठा हल्ला इराणवर केला. त्यानंतर इराणकडून अमेरिकेच्या लष्कर तळांना टार्गेट करून हल्ले करण्यात आली.

एक महिना युद्ध चालण्याचे संकेत होते. मात्र, एक महिना उलटूनही युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. इराणने या युद्धात होर्मुज खाडी बंद केली. तुर्की, इजिप्त आणि पाकिस्तान यांच्याकडून युद्ध थांबवण्याकरिता मध्यस्थी केली जात आहे. पण यश काही मिळत नाही. (Iran-US-Israel War)

यादरम्यानच इराणकडून भारताचे कौतुक करण्यात आले. भारत युद्ध थांबवण्याची मागणी करत आहे. इराण आणि इस्त्रायल दोन्ही भारताचे मित्र आहेत. कोणत्याही पद्धतीने युद्ध अधिक भडकण्यापेक्षा युद्ध थांबण्याची भूमिका भारताची आहे. इराणच्या सर्वाोच्च नेत्यांचे भारतातील प्रतिनिधी अब्दुल माजिक हकीम इलाही यांनी यादरम्यानच्या परिस्थितीवर बोलताना म्हटले की, या युद्धात भारत महत्वाची भूमिका बजावू शकतो. एएनआयच्या वृत्तानुसार, अब्दुल माजिक हकीम इलाही यांनी म्हटले, भारताची डिप्लोमेसी खूप जास्त चांगली आहे. (Iran-US-Israel War)

- Tehran Airstrike: तेहरानजवळील निवासी इमारतीवर बॉम्ब हल्ला, १३ जणांचा मृत्यू

विशेष म्हणजे हे विधान अशावेळी आहे, होर्मुज खाडी खुली करण्यासाठी इराणला अल्टिमेट देण्यात आला. त्यांनी पुढे म्हटले की, भारत निश्चितपणे तणाव कमी करण्यात सकारात्मक भूमिका निभावू शकतो. आपल्या संतुलित परराष्ट्र धोरणामुळे भारत तणाव कमी करण्यास आणि संवादाला चालना देण्यास मदत करू शकतो, असेही त्यांनी म्हटले. इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनीही एस. जयशंकर आणि रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यावर फोनवरून संवाद साधला. (Iran-US-Israel War)

- Strait of Hormuz Crisis: "आम्ही होर्मुझच्या चाव्या हरवल्या आहेत"; इराणने ट्रम्प यांच्या 'अल्टिमेटम'ची उडवली खिल्ली!

इराणचे म्हणणे आहे की, अमेरिका आणि इस्त्रायल त्यांच्या पायाभूत सुविधा, हॉस्पिटल, शाळा, लोकवस्ती, कंपन्या, परमाणु केंद्रांना टार्गेट करून हल्ले करत आहेत. इराण आणि अमेरिका युद्धात मागील काही तासापासून अनेक मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. कोणत्याही स्थितीमध्ये युद्धबंदी व्हावी, ही जगाची इच्छा आहे. कारण सर्वजण युद्धात होरपळत आहेत. महागाई प्रचंड वाढली आणि कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. (Iran-US-Israel War)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post