Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

ISI Terror Module : मंदिरं, पोलीस ठाण्यांची रेकी अन् पाकिस्तानी कनेक्शन.; दिल्लीत कसा उधळला मोठ्या घातपाताचा कट?

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने एका मोठ्या आंतरराज्यीय कारवाईत पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) द्वारे समर्थित एका दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी दिल्ली आणि पंजाबमधून चार दहशतवाद्यांना अटक केली आहे.

अटक केलेल्या दहशतवाद्यांकडून तुर्की बनावटीच्या झिगाना पिस्तुलासह दोन विदेशी पिस्तूल, नऊ काडतुसे आणि पाच मोबाईल फोन जप्त करण्यात आले.(ISI Terror Module)

तरुणांना जाळ्यात अडकवलं

स्पेशल सेलचे डीसीपी प्रवीण कुमार त्रिपाठी यांच्या म्हणण्यानुसार, एसीपी विवेक कुमार त्यागी, इन्स्पेक्टर सतीश राणा आणि इन्स्पेक्टर अशोक यांच्या पथकाला गुप्त माहिती मिळाली होती की, पाकिस्तानस्थित आयएसआयचा हँडलर शहजाद भट्टी आपल्या साथीदारांसह दिल्ली एनसीआरमध्ये एका मोठ्या दहशतवादी हल्ल्याची योजना आखत होता. यासाठी त्याने पंजाबमधील स्थानिक तरुणांना जाळ्यात ओढले होते. अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे साजन उर्फ ​​हनी, गगनप्रीत, ऋषी आणि शुभदीप अशी आहेत.(ISI Terror Module)

धार्मिक स्थळांची रेकी

तपासात असे उघड झाले की, अटक केलेल्या आरोपींपैकी, गगनप्रीतला त्याच्या पाकिस्तानी हँडलर्स कडून धार्मिक स्थळांची तसेच अन्य महत्त्वाच्या ठिकाणांची रेकी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. त्याने दिल्लीतील पोलीस ठाणी, पोलीस चौक्या आणि प्रमुख धार्मिक स्थळांची टेहळणी करून याचे व्हिडिओ पाकिस्तानला पाठवले होते. दिल्लीतील गर्दीच्या ठिकाणी अंदाधुंद गोळीबार करून दहशत पसरवण्याचे काम त्याला सोपवण्यात आले होते.(ISI Terror Module)

हे नेटवर्क उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी अमृतसर, पंजाब आणि दिल्ली येथे छापे टाकले. सर्वात आधी अटक झालेला शुभदीप सिंग, ड्रोनमार्फत शस्त्रास्त्रांची खेप स्वीकारण्यासाठी जबाबदार होता. त्याने दिलेल्या माहितीनुसार, गुरजंत सिंग आणि गगनप्रीत यांना अटक करण्यात आली. पोलीस आता त्यांच्या उर्वरित साथीदारांचा शोध घेत आहेत.(ISI Terror Module)

हेही पाहा:

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post