Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
Khelo India : खेलो इंडियासाठी २९,०५४ कोटींचा निधी मंजूर, भारताला क्रीडा महासत्ता बनवण्याचा निर्धार

Khelo India : खेलो इंडियासाठी २९,०५४ कोटींचा निधी मंजूर, भारताला क्रीडा महासत्ता बनवण्याचा निर्धार

  • ऋजुता लुकतुके

केंद्र सरकारने भारताच्या क्रीडा विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत 'खेलो इंडिया'(Khelo India)योजनेसाठी पुढील पाच वर्षांसाठी २९,०५४ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे.

केंद्रीय मंत्रिमंडळाने शुक्रवारी या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला. या निर्णयामुळे देशभरातील तळागाळातील प्रतिभावान खेळाडू शोधणे, त्यांना प्रशिक्षण देणे आणि आधुनिक क्रीडा पायाभूत सुविधा उभारणे यावर विशेष भर दिला जाणार आहे.(Khelo India)

सरकारचा उद्देश भारताला जागतिक क्रीडा केंद्र (Global Sporting Hub) म्हणून विकसित करणे हा आहे. भारताने २०३० राष्ट्रकुल स्पर्धा आयोजित करण्याची इच्छा व्यक्त केली असून, २०३६ ऑलिम्पिकसाठीही दावेदारी प्रक्रिया सुरू करण्याची तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर 'खेलो इंडिया'चा विस्तार हा देशाच्या दीर्घकालीन क्रीडा धोरणाचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.(Khelo India)

नव्या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि तळागाळातील स्तरावरील प्रतिभा शोध, क्रीडा विज्ञान, प्रशिक्षक विकास, महिला आणि दिव्यांग खेळाडूंना प्रोत्साहन, तसेच पारंपरिक भारतीय खेळांचा विकास यावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. देशातील विविध राज्यांमध्ये खेलो इंडिया केंद्रे आणि उत्कृष्टता केंद्रे अधिक सक्षम करण्याचाही आराखडा आहे.(Khelo India)

( – Saffron Jersey Row : हॉकी संघाच्या भगव्या जर्सीमुळे झालेला वाद चिघळला, हॉकी इंडियाने उचलली पावलं )

क्रीडा मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या देशातील अनेक जिल्ह्यांमध्ये १,०००हून अधिक खेलो इंडिया केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांमधून हजारो युवा खेळाडूंना प्रशिक्षण, आर्थिक सहाय्य आणि स्पर्धात्मक संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. नव्या निधीमुळे या सुविधांचा विस्तार आणि दर्जा सुधारण्यास मदत होणार आहे.(Khelo India)

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया यांनी या निर्णयाचे स्वागत करत म्हटले की, "भारताला २०३६पर्यंत जगातील अव्वल क्रीडा राष्ट्रांमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी हा मोठा टप्पा आहे." त्यांनी सांगितले की, केवळ पदके जिंकणे हा उद्देश नसून देशात क्रीडा संस्कृती निर्माण करणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.(Khelo India)

गेल्या काही वर्षांत भारताने ऑलिम्पिक, आशियाई स्पर्धा आणि राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. त्यामुळे तळागाळापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत मजबूत क्रीडा संरचना उभारण्यासाठी 'खेलो इंडिया'चा विस्तार निर्णायक ठरणार असल्याचे क्रीडा तज्ज्ञांचे मत आहे.(Khelo India)

सरकारच्या या निर्णयामुळे युवा खेळाडूंना अधिक संधी, चांगल्या सुविधा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील तयारी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.(Khelo India)

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post