Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story

kolhapur: तृतीयपंथीयांना बचाव कार्यत स्थान देण्याचा ऐतिहासिक निर्णय, 'हे' प्रशिक्षण म्हणजे ? जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी सांगितले.

Kolhapur: महापूर, भूकंप अथवा कोणतीही आपत्कालिन नैसर्गिक आपत्ती ओढवल्यास आपदामित्र आणि आपदासखी जीव धोक्यात घालून बचाव कार्यासाठी झोकून देऊन काम करतात, मात्र आता त्यांच्या जोडीला तृतीयपंथीयही आपत्कालिन मदत करण्यासाठी सहभागी होणार आहेत.

कोल्हापुरातील आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून या शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यात येत आहे. त्याचे १० जणांचे पथक आता तयार करण्यात आले आहे. भविष्यात कोणतीही आपत्ती ओढवल्यास बचाव कार्यासाठी तृतीयपंथीयांचे एक पाऊन यानिमित्ताने पुढे असणार आहे. मुख्य म्हणजे राष्ट्रीय स्तरावर तृतीयपंथीयांना आपत्कालिन प्रशिक्षण देणारा कोल्हापुरातील हा पहिलाच उपक्रम आहे, असा दावा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ यांनी केला आहे.

विविध प्रकारचे प्रशिक्षण
तृतीयपंथीयांना मोटर बोट कशी चालवावी, पाण्यात बुडणाऱ्या व्यक्तिला पाण्याबाहेर कसे काढावे, बोट कशी तयार करावी, नदीत बुडालेल्या व्यक्तिला शुद्धीवर आणण्यासाठी प्रथमोपचार कसे द्यावेत, बोट कशी तयार करावी यांचं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण याअंतर्गत दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण म्हणजे मान्सूनपूर्व तयारीचा एका भाग आहे. त्या दृष्टीने १० तृतीय पंथीयांच्या पथकाला प्रथमच हे प्रशिक्षण देण्यात आले. चार ते पाच दिवस हे प्रशिक्षण दिले जाणार आहे. आपत्तीच्या वेळी हे तृतीय पंथीय मदतीसाठी सहभागी होणार आहेत. समाजाच्या कोणत्याही आपत्तीच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी त्यांची मदत घेतली जाणार आहे.

GT vs RR Qualifier 2 : शुभमन गिलच्या शतकामुळे सूर्यवंशीची चमक फिकी पडली, गुजरात टायटन्स तिसऱ्यांदा अंतिम फेरीत दाखल

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. प्रसाद संकपाळ यांच्या प्रयत्नातून आणि कोल्हापूरातील हक्क आणि अधिकारांसाठी काम करणाऱ्या मैत्री संघटनाच्या प्रमुख मयुरी आळवेकर, शिवानी गजबर, झोया दिन्नी, सुलभा, वैशाली, मोगरा आदी या तृतीयपंथीयांना प्रशिक्षण देणे सुरू आहे.

“हा निर्णय घेण्याचं श्रेय मी आमच्या आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमला देईन. ते पाच-सहा वर्षांपासून खूप मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. त्यांनी प्रत्येकाला या पूर्ण प्रवाहात एकत्र यावं असं काम केलं आहे. मुलींची वेगळी रेस्क्यू टीम तयार केली. त्यानंतर आपण तृतीयपंथींची टीम तयार केली आहे”, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.
हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post