Dailyhunt

LPG Cylinder Tax: 'एलपीजी' आणि 'पीएनजी'वरील कर रद्द करण्याची मागणी, व्यापार उद्योग मंडळाचे पंतप्रधानांना पत्र

LPG Cylinder Tax : अमेरिका आणि इराणमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे संकट ओढवले असून भारतातही एलपीजी (LPG) आणि पीएनजी (PNG) गॅसच्या दरात मोठी वाढ झाली आहे. यामुळे चेंबर ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्री (CTI) या व्यापारी संघटनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून एलपीजी आणि पीएनजी गॅस पूर्णपणे करमुक्त करण्याची मागणी केली आहे.

गॅसवरील कर काढून टाकल्यास सर्वसामान्यांचे बजेट सावरण्यास मोठी मदत होईल, असा दावा या संघटनेने केला आहे.

सीटीआयचे अध्यक्ष ब्रीजेश गोयल यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात नमूद केलं आहे की, इंधन टंचाईमुळे लोक आता वेगाने पीएनजीकडे वळत आहेत. दिल्लीत फेब्रुवारी २०२६मध्ये दररोज ६८६ नवीन पीएनजी कनेक्शन जोडले जात होते. मार्चमध्ये हा वेग तीन पटीने वाढून दररोज २,००० कनेक्शनपर्यंत पोहोचला आहे. पश्चिम आश्चियातला संघर्ष पाहता, सरकारने व्हॅट आणि जीएसटीमध्ये सवलत देऊन वाढत्या महागाईतून जनतेला वाचवावे, अशी विनंतीही त्यांनी संघटनेच्या वतीने पत्रात केली आहे.

सध्या ‘एलपीजी’ आणि ‘एनपीजी’वर गॅसवर लागणारा टॅक्स किती?

एलपीजी आणि एनपीजीवर सध्या केंद्र आणि राज्य सरकारकडून खालीलप्रमाणे कर आकारला जातो.

घरगुती एलपीजी सिलिंडर : ५ टक्के जीएसटी

कमर्शियल सिलिंडर (हॉटेल, रेस्टॉरंट): १८ टक्के जीएसटी

पीएनजी (पाईप गॅस) : (pipe gas) हा गॅस जीएसटीच्या कक्षेत नसल्याने राज्य सरकारे त्यावर ३ टक्के ते १४.५ टक्क्यांपर्यंत व्हॅट आकारतात. दिल्लीत सध्या ५ टक्के व्हॅट लागू आहे.

हेही पहा –

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: Hindusthan Post