मध्यपूर्वेत सध्या सुरु असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर जर पाकिस्तानने आगळीक केली, तर असा धडा शिकवू की जन्माची अद्दल घडेल. ऑपरेशन सिंदूर अजून संपले नाही, अशा शब्दांत देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला दम भरला आहे.
केरळममध्ये आयोजित सैनिक सन्मान संमेलन कार्यक्रमात राजनाथ सिंह (Rajnath Singh) बोलत होते.
काय म्हणाले राजनाथ सिंह?
आपले शेजारी सध्या अशा स्थितीत आहेत की ते काहीतरी आगळीक करु शकतात. त्यांनी असे केल्यास भारताकडून जोरदार आणि तीव्र स्वरुपाचे उत्तर दिले जाईल. ऑपरेशन सिंदूर अद्याप समाप्त झालेले नाही, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.
इराणच्या होर्मुझ सामुद्रधुनीतून भारतीय जहाजांना भारतीय नौसेना सुरक्षितपणे बाहेर काढून देशात आणत आहे. देशात इंधन तुटवडा असल्याचा दावा राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी खोडून काढला. मध्यपूर्वेतील संघर्षावरुन काहीजण विनाकारण अफवा पसरवून भीती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही सिंह म्हणाले. देशात पेट्रोल, डिझेल किंवा गॅसचा तुटवडा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले
विरोधकांवर टीका
विरोधक इंधन, तेल या विषयावरुन राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. या कठीण काळात देशाबरोबर उभे न राहता ते राजकारण करत असल्याचे सिंह (Rajnath Singh) म्हणाले. मध्यपूर्वेत संघर्ष सुरु असल्याने हा काळ थोडा आव्हानात्मक आहे. केरळममधील अनेक लोक या भागात काम करतात पण, त्यांच्या सुरक्षेची काळजी सरकार घेत आहे, त्यामुळे अधिक काळजी करु नये, असे राजनाथ सिंह (Rajnath Singh) म्हणाले.
