भारत सरकार आणि सोशल मीडिया क्षेत्रातील दिग्गज कंपनी मेटा यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र झाला आहे. भाग्यनगर येथील सायबर गुन्हे पोलिसांनी मेटा इंडियाचे प्रमुख अरुण श्रीनिवास (Arun Srinivas) यांच्यासह अनेक समाजमाध्यम वापरकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्या एका व्हिडीओमध्ये फेरबदल करून ती चुकीच्या पद्धतीने प्रसारित केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर करून तयार करण्यात आलेली ही बनावट व्हिडीओ फेसबुक आणि इंस्टाग्राम या मंचांवर मोठ्या प्रमाणावर सामायिक करण्यात आली होती, ज्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला. (Meta India Head FIR)
बनावट तंत्रज्ञानाचा गैरवापर आणि पोलीस तपास
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांनी एका आंदोलनादरम्यान सामायिक केलेल्या मूळ व्हिडीओमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने छेडछाड करण्यात आली होती. ही दिशाभूल करणारी व्हिडीओ माहिती तंत्रज्ञान कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या तरतुदींचे उल्लंघन करते. सायबर पोलीस आता या प्रकरणाच्या मुळाशी जात असून ही बनावट व्हिडीओ नेमकी कोणी तयार केली आणि ती वेगाने पसरवण्यामागे कोणाचा हात आहे, याचा शोध घेत आहेत. यासोबतच अशा प्रकारची आक्षेपार्ह सामग्री रोखण्यात मेटाची सुरक्षा यंत्रणा अपयशी ठरली का, याचीही तपासणी केली जात आहे. (Meta India Head FIR)
( –Koyna Dam मध्ये अचानक वाढला विसर्ग; कृष्णा नदीकाठी राहणाऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा )
सोशल मीडिया कंपन्यांना नोटीस आणि आगामी चित्रपटया कारवाईच्या काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी मेटाच्या प्रतिनिधींना बोलावून मेटा साईटवरील बनावट जाहिराती आणि गैरप्रकार रोखण्याबाबत जाब विचारला होता. त्यातच आता थेट कंपनीच्या भारतीय प्रमुखांवर गुन्हा दाखल झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. दुसरीकडे, या आंदोलनावर आधारित एका आगामी चित्रपटाचीही जोरदार चर्चा रंगत असून, त्यातील मुख्य भूमिका कोण साकारणार याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात येण्याची शक्यता असून त्याभोवतीचे गूढ अद्याप कायम आहे.

